Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचार, आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्युची नोंद!-over 72 killed in bangladesh as govt job quota agitation erupts again ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचार, आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्युची नोंद!

Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचार, आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्युची नोंद!

Aug 04, 2024 08:10 PM IST

Violence In Bangladesh: सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत बांगलादेशात हिंसाचार उफळला असून आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार
सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार (REUTERS)

Bangladesh Violence News: सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत हसीना सरकारच्या भूमिकेविरोधात बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा रविवारी ७२ वर पोहोचला आहे. देशाची राजधानी ढाका, बोगरा, पबना, रंगपूर, मगुरा, कोमिला, बरिसाल आणि फेनी जिल्ह्यात हे मृत्यू झाले आहेत. रविवारी संध्याकाळी देशाच्या सरकारकडून देशात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आरक्षण प्रणाली बंद करण्याच्या मागणीवरून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर देशात २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी हिंसाचाराची नवी फेरी उसळली. १९७१ च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ३० टक्के सरकारी नोकऱ्या राखीव होत्या.

बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन संपुष्टात आले असून हजारो जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या असहकार कार्यक्रमात सहभागी झालेल्या आंदोलकांची अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीग या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी रविवारी सकाळी चकमक झाली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी सायंकाळी ०६.०० वाजल्यापासून बांगलादेशात बेमुदत संचारबंदी लागू केली असून आंदोलनाच्या नावाखाली देशभरात घातपात करणाऱ्यांना दहशतवादी म्हटले आहे.

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, हसीना आणि लष्कर, नौदल, हवाई दल, पोलिस, आरएबी, बीजीबी आणि इतर शाखांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयानंतर गृह मंत्रालयाचे वरिष्ठ माहिती अधिकारी मोहम्मद शरीफ महमूद अपू यांनी संचारबंदीच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. ढाक्यातील शाहबाग येथे भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीच्या बॅनरखाली शेकडो विद्यार्थी आणि व्यावसायिक जमले होते आणि त्यांनी घोषणा बाजी केली आणि हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

शनिवारी बांगलादेशच्या पंतप्रधानांनी चळवळीच्या समन्वयकांसोबत बसण्याची तयारी दर्शवली. मात्र, हसीना यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीनंतर आंदोलकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला पंतप्रधानांचा प्रस्ताव विद्यार्थी आंदोलकांनी फेटाळून लावला आणि सरकारच्या राजीनाम्याची एकजूट केली.

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक

बेकायदा वास्तव्य आणि जन्म दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टसह बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. पडताळणी मोहिमेदरम्यान एका कॉन्स्टेबलने एका संशयिताला पकडले आणि नंतर इतर तिघांना अटक करण्यात आली. सगोर सुशांतो बिस्वास (वय,२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डेब्रोटो वोबेन बिस्वास (वय,२६), जॉनी वोबेन बिस्वास (वय, २७) आणि रोनी अनुप सिकदर (वय, २८). पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३१८ (फसवणूक), ३३६ (फसवणूक), ३४० (बनावट कागदपत्रांचा खरा म्हणून वापर) आणि ३ (सामान्य स्पष्टीकरण) तसेच १९४६ चा परदेशी नागरिक कायदा, १९६७ चा पासपोर्ट कायदा आणि १९२० चा पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

विभाग