घरात सर्वत्र नोटांची बंडले.. कॅश मोजणाऱ्या मशिनीही झाल्या खराब; काँग्रेस खासदाराकडे इतके पैसे कुठून आले?-over 100 crore recovered in raids how congress mp dhiraj sahu earn money ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घरात सर्वत्र नोटांची बंडले.. कॅश मोजणाऱ्या मशिनीही झाल्या खराब; काँग्रेस खासदाराकडे इतके पैसे कुठून आले?

घरात सर्वत्र नोटांची बंडले.. कॅश मोजणाऱ्या मशिनीही झाल्या खराब; काँग्रेस खासदाराकडे इतके पैसे कुठून आले?

Dec 08, 2023 01:22 PM IST

Income Tax Raids on Dhiraj Sahu : आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे जवळपास ३०० कोटींची रोकड आढळली आहे. इतके पैसे त्यांच्याकडे कसे याची चर्चा सुरू आहे.

Income Tax Raids on Dhiraj Sahu
Income Tax Raids on Dhiraj Sahu

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केली आहे. खासदाराच्या  रांची,  लोहरदगा आणि ओडिशा येथील ठिकाणांवर मारलेल्या छाप्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश हस्तगत करण्यात आली की, हे पैसे बँकेपर्यंत नेण्यासाठी ट्रक आणाले लागले. सांगितले जात आहे की, कॅश मोजणी करणाऱ्या मशिनींवर इतका लोड पडला की, त्याही खराब झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५० कोटी रुपयांच्या रोकडची मोजणी झाली असून अजूनही निम्मी कॅश मोजणी करणे बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ३०० कोटी रुपयांची रोकड आयकर विभागाच्या हाती लागली आहे. 

हे पैसे ओडिशा राज्यातील बोलांगीर येथून जप्त करण्यात आले आहेत. येथे धीरज साहू आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दारूच्या फॅक्टरी आहेत. बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज साहू कुटूंबीयांची आहे. कंपनीचा ओडिशामध्ये दारू उत्पादनाचा गेल्या ४० वर्षापासूनचा व्यवसाय आहे. धीरज साहू यांचे वडील बदलेव साहू यांच्या नावाने या ग्रुपचे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये धीरज साहू यांच्याशिवाय त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान,  २०१८ मध्ये धीरज साहू यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ३४ कोटी दाखवली होती.

काल (बुधवारी) आयकर पथकाने बौध डिस्टिलरीज प्राय़व्हेट लिमिटेड आणि याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज, बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडची एक पार्टनरशिप कंपनी आहे. या ग्रुपचे अनेक उद्योग आहेत. त्यामध्ये क्वॉलिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयएमएफएल बोटलिंग), किशोर प्रसाद विजय प्रसाद बिवरेज प्रायव्हेट लिमिटेड (जी आयएमएफल कंपनीचे सेल्स अँड मार्केटिंगचे काम करते), बलदेव साहू इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड आदिचा समावेश आहे. या कारवाईबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता.

९ तिजोऱ्या भरून मिळाल्या नोटा -
बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या कार्यालयात ९ तिजोऱ्या भरून रोकड मिळाली. ही रोकड बँकेत घेऊन जाण्यासाठी १५७ बॅग आणण्यात आल्या. या बॅग कम पडल्यानंतर पोत्यात भरून कॅन बँकेत नेण्यात आली. ही रोकड ट्रकमध्ये लादून बँकेत आणण्यात आली. 

Whats_app_banner
विभाग