मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक.. “आम्हाला हिंदी नकोय” DMK कार्यालयाबाहेर शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवलं

खळबळजनक.. “आम्हाला हिंदी नकोय” DMK कार्यालयाबाहेर शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 26, 2022 07:24 PM IST

आम्हाला हिंदी नकोय. आमची मातृभाषा तामिळ आहे. हिंदी ही विदुषकांची भाषा आहे, असा बॅनर हातात घेऊन एका ८५ वर्षीय शेतकऱ्याने डीएमके कार्यालयाबाहेर अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यामुळे तामिळनाडूमध्ये हिंदीविरोधी आंदोलन हिंसक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवलं
शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवलं

तामिळनाडू राज्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याने हिंदी भाषा लादण्याला विरोध करताना स्वत:ला पेटवून घेतले. ही घटना सालेम जिल्ह्यातील आहे. येथे एका ८५ वर्षीय शेतकऱ्याने हिंदीचा विरोध करताना DMK कार्यालयाबाहेर पेटवून घेतले. मृताचे नाव थंगावेल सांगितले जात आहे. थंगावेल डीएमके पक्षाचे माजीकृषी संघ आयोजक होते. शनिवारी सकाळी ते डीएमके पक्ष कार्यालयाबाहेर केंद्र सरकारकडून तामिळ जनतेवर हिंदी लादण्याचा विरोध करत होते.

इंडिया टुडेच्यारिपोर्टनुसार थंगावेल यांनी आपल्या शरीरावर पेट्रोल टाकून आग लावली या घटनेत त्यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. थंगावेल DMK पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ते होते. हिंदीला शिक्षणाचे माध्यम बनवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ते नाराज होते.

रिपोर्टनुसारआत्मदहन करण्यापूर्वी थंगावेल यांनी एका बॅनरवर लिहिले होते की, "मोदी सरकार, केंद्र सरकार, आम्हाला हिंदी नकोय. आमची मातृभाषा तामिळ आहे आणि हिंदी विदूषकांची भाषा आहे. हिंदी भाषा लादल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हिंदीपासून मुक्ती, हिंदीपासून मुक्ती, हिंदीपासून मुक्ती"

तामिळनाडूमधील सत्तारुढ पार्टी डीएमकेचे युवा सेलचेसचिवआणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचा मुलगाउदयनिधि स्टालिनयांनी इशारा दिला होता की, जरराज्यात जोर जबरदस्तीने हिंदी लादण्याचा प्रयत्न केल्यास डीएमके दिल्लीतभाजप सरकारविरोधात आंदोलन करेल.

तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेविरोधात आंदोलन, निदर्शने सुरू आहेत. केंद्र सरकार लोकांच्या भावना पायदळी तुडवू शकत नाही असा इशारा डिएमकेने दिला आहे. एका संसदीय समितीच्या शिफारशीवरून तामिळनाडूत वाद निर्माण झाला आहे. हिंदी भाषा राज्यात तांत्रिकी, अतांत्रिकी उच्च शिक्षण संस्था, आयआयटीमध्ये हिंदीत शिक्षण द्यायला हवं. त्यावरून केरळ, तामिळनाडू येथील मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकार हिंदी भाषा आमच्या राज्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या