Job in Israel : भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्यात २०२३ साली रोजगाराबाबत करार झाला होता. या करारानुसार इस्रायलमध्ये काम करण्यासाठी भारतातील कुशल कामगारांची भरती करण्यावर चर्चा झाली होती. या भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. देशभरातून १० हजाराहून अधिक कुशल कामगारांना इस्रायलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया उद्या १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. इस्रायलमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना बांधकाम क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
इस्रायलने भारतातील ५ हजार काळजी घेऊ शकणाऱ्यांची देखील मागणी केली आहे. ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थांचे प्रमाणपत्र आहे. तसेच ज्यांच्याकडे किमान ९९० तासांच्या कामाचा अनुभव असेल. या प्रकारचा कोर्स देखील त्यांनी पूर्ण केला असावा अशी यासाठी अट ठेवण्यात आली आहे. इस्रायलची लोकसंख्या, इमिग्रेशन आणि बॉर्डर अथॉरिटी (PIBA) ची टीम कौशल्य चाचणी घेण्यासाठी व योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी पुढील आठवड्यात भारतात येणार आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये भारत आणि इस्रायल सरकारमध्ये याबाबत एक करार झाला होता. या मोहिमेअंतर्गत फ्रेमवर्क, लोखंडी बेंडिंग, प्लास्टरिंग आणि सिरॅमिक टाइलिंगमध्ये कुशल कामगारांना या नोकऱ्या मिळणार आहेत.
हमासवरील हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी मजुरांचे कामाचे परवाने निलंबित करण्यात आहेत. यानंतर इस्रायलला कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे इस्रायल आता भारतात कामगारांची भरती करत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पात्र ठरलेल्यांची इस्रायलमधील नोकऱ्यांसाठी निवड केली जाईल. बांधकाम कामगारांच्या भरतीची ही फेरी महाराष्ट्रात आयोजित केली जाणार आहे.दरमहा १.९२ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. देशातील आघाडीची वृत्तसंस्था असलेल्या पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, या पूर्वी देखील मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार ही इस्रायलमध्ये गेले आहेत. त्यांना तिथे बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करण्याची संधी दिली गेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.