
Job 2023: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ओएनजीसीमध्ये पदवीधर आणि आयटी उमेदवारांना नोकरीची संधी आहे. ओएनजीसी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण ४४५ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला गुरुवारपासून (२१ सप्टेंबर) सुरुवात झाली. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
ओएनजीसी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण ४४५ जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार १८ ते २४ वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे. उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. दरम्यान, २१ सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात सुरुवात झाली आहे. तर, ३० सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवारांची नियुक्ती १२ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल. पदवीधर अप्रेंटिसना दरमहा ९००० रुपयांचे वेतन दिले जाईल. तर, डिप्लोमा अप्रेंटिसना ८ हजार प्रतिमहिना वेतन दिले जाईल. पात्रता परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार ओएनसीजीच्या अधिकृत वेबसाईट www.ongcindia.com वर भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या
