OnePlus Green Line : वनप्लस वापरकर्त्यांसाठी खुशखबर; ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus Green Line : वनप्लस वापरकर्त्यांसाठी खुशखबर; ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

OnePlus Green Line : वनप्लस वापरकर्त्यांसाठी खुशखबर; ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

Jul 31, 2024 04:45 PM IST

OnePlus Free Display Replacement: वनप्लस कंपनीच्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर हिरव्या रंगाच्या उभ्या रेषा येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अशा ग्राहकांसाठी कंपनीने फ्री डिस्प्ले रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.

वनप्लस वापरकर्त्यांसाठी खुशखबर!
वनप्लस वापरकर्त्यांसाठी खुशखबर!

OnePlus: गेल्या काही वर्षांपासून विविध ब्रँडमधील अनेक स्मार्टफोन युजर्स अमोलेड डिस्प्लेवर ग्रीन लाईनच्या समस्येला सामोरे जावा लागत आहे. ही समस्या सहसा मोठ्या सॉफ्टवेअर अपडेटनंतर नोंदविली गेली, ज्यामुळे वापरकर्ते पुढे काय करावे, याबद्दल पॅनिक झोनमध्ये राहिले. स्मार्टफोन ब्रँड डिस्प्ले रिप्लेसमेंटसाठी भरमसाठ पैसे आकारतात. मात्र, वनप्लस कंपनी आपल्या ग्राहकांसाठी मोफत डिस्प्ले रिप्लेसमेंट आणि लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी देत आहे.

स्टारकमांडर नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका एक्स वापरकर्त्याने पोस्ट केले की, भारतातील वनप्लस रेड केबल क्लब मेंबरशिप प्रोग्राम वापरकर्त्यांना लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटीसह अनेक फायदे प्रदान करतो. कंपनीने लाइफटाइम फ्री स्क्रीन अपग्रेड देण्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये वनप्लस ८ प्रो, वनप्लस ८ टी, वनप्लस ९ आणि वनप्लस ९ आर वापरकर्ते विनामूल्य डिस्प्ले रिप्लेसमेंटसाठी पात्र आहेत, ज्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह डायग्नोस्टिक, स्क्रीन अपग्रेड्स आणि रिप्लेसमेंट आणि डीप क्लीनिंग सर्व्हिसेसचा समावेश आहे आणि या सर्व सेवा विनामूल्य आहेत.

या सेवा आता विक्रीसाठी उपलब्ध नसलेल्या वनप्लस स्मार्टफोनलाच लागू होतील. सध्या हे फायदे केवळ भारतातच उपलब्ध असून नजीकच्या काळात अमेरिकेतही या उपक्रमाचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच, सध्या विकल्या जाणाऱ्या वनप्लस फ्लॅगशिप्सना असेच फायदे मिळतील की नाही याची खात्री नाही. लक्षात घ्या की, या विनामूल्य सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेड केबल क्लब सदस्य व्हावे लागेल.

रेड केबल क्लब प्रोग्राम हा वनप्लसचा लाइफटाइम फ्री मेंबरशिप प्रोग्राम आहे जो वापरकर्ते कंपनीचे डिव्हाइस मिळाल्यानंतर भाग घेऊ शकतात. त्यांना फक्त वनप्लस अकाऊंट तयार करून आपला फोन लिंक करायचा आहे. एकदा, यशस्वीरित्या लिंक केल्यावर वापरकर्ते रेड केबल क्लब सदस्यत्व लाभांचा आनंद घेऊ शकतात.

वनप्लस पॅडच्या किंमतीत मोठी कपात

वनप्लसने नुकताच इटलीतील मिलान येथे झालेल्या समर लॉन्चिंग इव्हेंटदरम्यान आपला नवीन प्रीमियम अँड्रॉइड टॅबलेट, वनप्लस पॅड २ चे अनावरण केले. या लॉन्चिंगनंतर चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या वनप्लस पॅड या आधीच्या मॉडेलच्या किंमतीत लक्षणीय कपात केली आहे.

वनप्लस पॅडच्या किंमतीत या वर्षातील ही दुसरी कपात आहे. फेब्रुवारीमध्ये या टॅब्लेटच्या किंमतीत सुरुवातीला १५०० रुपयांची घसरण झाली होती. वनप्लस पॅड दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. पहिल्या किंमतीत कपात केल्यानंतर हे व्हेरियंट अनुक्रमे ३६ हजार ४९९ रुपये आणि ३८ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध होते. वनप्लस पॅडच्या ८ जीबी व्हर्जनची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. तर,१२ जीबी व्हर्जनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे.

Whats_app_banner