OnePlus 11: वनप्लस ११ झाला स्वस्त, ग्राहकांकडे २३ हजार वाचवण्याची संधी, अ‍ॅमेझॉनची जबरदस्त डील!-oneplus 11 gets massive price cut on amazon now available for under 40000 ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  OnePlus 11: वनप्लस ११ झाला स्वस्त, ग्राहकांकडे २३ हजार वाचवण्याची संधी, अ‍ॅमेझॉनची जबरदस्त डील!

OnePlus 11: वनप्लस ११ झाला स्वस्त, ग्राहकांकडे २३ हजार वाचवण्याची संधी, अ‍ॅमेझॉनची जबरदस्त डील!

Aug 29, 2024 08:30 PM IST

OnePlus 11 at Massive Price Cut on Amazon: अ‍ॅमेझॉनवर वनप्लस ११ च्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. पहिल्यांदाच हा फोन इतक्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.

वनप्लस ११ स्वस्तात खरेदी करण्याची संधी
वनप्लस ११ स्वस्तात खरेदी करण्याची संधी

OnePlus 11 Price and Features: स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने फेब्रुवारी २०२३ मध्ये वनप्लस ११ 5G भारतात लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन सध्या अ‍ॅमेझॉनवर लॉन्च होणाऱ्या किंमतीपेक्षा २३ हजार रुपये स्वस्त मिळत आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ आणि १६ जीबी रॅमसह येतो. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्ही ४०००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. वनप्लसच्या फोनवर अशी दमदार सूट वारंवार मिळत नाही. ४०००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्रीमियम डिव्हाइस खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी चांगली डील आहे.

वनप्लस ११ 5G चा १६ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंट तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून ३८ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन फक्त हिरव्या रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन फेब्रुवारी २०२३ मध्ये ६१ हजार ९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला. इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून ३१,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. आता आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगतो.

वनप्लस ११ 5G: डिस्प्ले आणि स्टोरेज

वनप्लस ११ 5G मध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह ६.७ इंचाची क्यूएचडी अमोलेड १२० हर्ट्झ एलटीपीओ स्क्रीन देण्यात आली आहे. मल्टिमीडियासाठी यात डॉल्बी अ‍ॅटमॉससोबत ड्युअल स्पीकर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आहे ज्यात अ‍ॅड्रेनो ७४० जीपीयू आणि १६ जीबी LPDDR5X रॅमसह २५६ जीबी यूएफएस ४.० स्टोरेज आहे. हे अँड्रॉइड १३ वर आधारित ऑक्सिजनओएस १३ वर चालते.

वनप्लस ११ 5G: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

हँडसेटमध्ये १०० वॉट सुपरवूक चार्जिंगसह ५,००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर वनप्लस ११ ५जी मध्ये ५० एमपी ओआयएस प्रायमरी ४८ एमपी अल्ट्रावाइड ३२ एमपी २ एक्स टेलिफोटो सेन्सर आणि १६ एमपी सेल्फी शूटर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, अलर्ट स्लाइडर आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्युरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर देण्यात आला आहे. वनप्लस ११ स्वस्तात मिळवण्यासाठी आणि या ऑफरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.

विभाग