वर्ष झाले, पण इस्रायल थांबायचं नावच घेईना! युद्ध सुरूच राहणार, काय आहे इस्रायलची पुढची रणनीती?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वर्ष झाले, पण इस्रायल थांबायचं नावच घेईना! युद्ध सुरूच राहणार, काय आहे इस्रायलची पुढची रणनीती?

वर्ष झाले, पण इस्रायल थांबायचं नावच घेईना! युद्ध सुरूच राहणार, काय आहे इस्रायलची पुढची रणनीती?

Published Oct 07, 2024 09:00 AM IST

one year of 7 october attacks israel : इस्राइलवर गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला करत १२०० इस्रायली नागरिकांना मारले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, इस्रायलने गझा आणि लेबनॉनवरील हल्ले तीव्र केले आहे.

इस्रायलवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्याची वर्षपूर्ती! पूर्वसंध्येला गाझा, लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हवाई हल्ले
इस्रायलवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्याची वर्षपूर्ती! पूर्वसंध्येला गाझा, लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हवाई हल्ले (REUTERS)

one year of 7 october attacks israel : पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या हल्ल्यात तब्बल १२०० इस्रायली ठार झाले होते तर काही जणांचे अपहरण करून त्यांना बंदी बनवण्यात आले होते. आजही हमासच्या ताब्यात काही इस्रायली आहेत. यानंतर इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केले होते. गेल्या वर्षभरापासून हे हमास आणि इस्रायल संघर्ष सुरू आहे. आता लेबनॉनवर देखील इस्रायलने हल्ले सुरू केले आहे. तर इराणशी देखील तणावाचे वातावरण आहे. युद्ध छेडल्याच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इस्रायलने लेबनॉनच्या बेरूतमध्ये भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तीनजण जखमी झाले. या हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणून हेझबोलानेही सोमवारी इस्रायलवर काही क्षेपणास्त्र डागले.

गाझा, इराण आणि लेबनॉन अशा तीन स्तरांवर इस्रायलकडून हवाई हल्ले केले जात आहेत. गेल्या महिन्यापासून इस्रायलने हवाई हल्ले वाढवले आहेत. रविवारी पुन्हा इस्रायलने लेबनॉनवर आणि गाझापट्टीत हवाई हल्ले केले. दरम्यान, ७ ऑक्टोबरसारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी हे हल्ले सुरूच राहणार असल्याचं इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. गेल्या वर्षी पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला करून शेकडो लोकांना बंधक बनवले होते. तेव्हापासून इस्रायलचा लेबनॉनचा हिजबुल्लाह हमास याच्याशी संघर्ष सुरू आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांनी हे युद्ध सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. "इस्रायलच्या नागरिकांचे रक्षण करण्याच्या आमच्या मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो या घटनेला ७ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. आम्ही १० दिवसांपासून ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यावर आत्मपरीक्षणकर करत आहोत.

या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष उलटून गेले आहे. आम्ही हमासच्या लष्करी आघाडीला पराभूत केले असून संघटनेच्या दहशतवाद्यांशी सध्या आम्ही लढत आहोत. हिजबुल्लाहचे देखील आम्ही कंबरडे मोडले असून अनेक मोठ्या नेत्यांना ठार करण्यात आले आहे. आज आम्ही विविध आघाड्यांवर लढत आहोत. आमच्या देशाच्या आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे हालेवी म्हणाले.

हालेवी म्हणाले, आयडीएफ आपल्या लोकांचे योग्य संरक्षण करण्यासाठी हे हल्ले करत आहेत.आम्ही आमच्या शत्रूच्या क्षमता नष्ट करत आहोत. यामुळे भविष्यातील आमच्यावर हल्ला करण्याची त्यांची क्षमता राहणार नाही.

गाझावर रविवारी भीषण हवाई हल्ले

गाझा पट्टीतील दहशतवाद्यांनी रविवारी दक्षिण इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या लष्करी कारवाईला एक वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला हे हल्ले करण्यात आले. या नंतर इस्रायलने देखील गाझापट्टीत भीषण हवाई हल्ले केले. यात १८ नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे.

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अश्केलॉन आणि लाशिश भागात रॉकेट डागले. उत्तर गाझा पट्टीतून इस्रायलच्या हद्दीत तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आले. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, एक क्षेपणास्त्र रोखण्यात आले, तर काही क्षेपणास्त्र हे मोकळ्या भागात पडले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर