Viral news : इंडिगोच्या बेंगळुरू-पाटणा फ्लाइटमधील एका प्रवाशाने आपल्या सहप्रवाशाला मारहाण व शिवीगाळही केली. फ्लाइटमधील प्रत्येकजण त्यांचं भांडण पाहून हैराण झाले. त्यांची तक्रार विमानातील क्रू कडे करण्यात आली. विमानयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लँडिंगनंतर आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले.
शुक्रवारी बेंगळुरूहून पाटण्याला येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात मोठा गोंधळ उडाला. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने अचानक दुसऱ्या सहप्रवाशाला शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. विमान पाटणा विमानतळावर उतरणार असताना फ्लाइट क्रमांक 6E 6451 मध्ये ही घटना घडली. विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, प्रवाशाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो तरुण मानसिकदृष्ट्या आजारी व विक्षिप्त असल्याचं म्हटलं आहे. चौकशीदरम्यान त्याने माफी मागायला सुरुवात केली. ज्या प्रवाशाला त्याने मारहाण केली त्याला ओळखन्यास देखील त्याने नकार दिला. या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही.
खरं तर, पाटणा विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधील दिवे बंद होताच, अचानक एक प्रवासी उठला व त्याने पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. लोकांना काही समजण्याच्या आत त्याने पुढील प्रवाशाला मारहाण केली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विमानात उपस्थित प्रवासी देखील चक्रावले.
या घटनेमुळे विमानात काही काळ गोंधळ उडाला. क्रू मेंबर्सनी हल्ला करणाऱ्या प्रवाशाला कसे तरी रोखले. हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला करणाऱ्या प्रवाशाला विमानातून बाहेर काढले. व पोळीसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत या प्रवाशाची चौकशी करण्यात आली.
या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्याने एका प्रवाशाने वैमानिकाच्या थोबाडीत मारली होती. त्यामुळे विमानात मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे या विमानात झालेल्या हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.