Viral News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये लग्नाच्या मधूचंद्राच्या रात्री चेहरा दाखवण्यासाठी वधूने नवरदेवाकडे बिअर व गांजाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे ऐकून नवरदेवाच्या पायाखालून जमीन सरकली. त्याने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला आणि हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिस आता दोन्ही बाजूंमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. वधू ही लुधियाना येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे घटना जुन्या शहरातील एका वसाहतीमध्ये घडली आहे. वधूने चेहरा दाखवण्यासाठी फक्त बिअरची नाही, तर बिअर आणताना गांजाही घेऊन या, अशी नववधू तिच्या नवऱ्याला म्हणाली. या सोबतच तिने मटण आणण्यास देखील सांगितले. हे सगळं ऐकून नवऱ्याला मोठा धक्का बसला. त्याने हा प्रकार घरच्यांना सांगितला. तसेच त्याने नववधू सोबत राहण्याला नकार दिला.
या घटनेवरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. मात्र नवरदेवाने हे प्रकरण पोलिसांत नेले. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी बराच वेळ दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीच निष्पन्न झाले नाही. माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. वधू पक्षाने सांगितले की, मुलीने आपल्या पतीकडे काही मागणी केली असेल तर ती त्यांच्यातील बाब आहे, कुटुंबातील सदस्यांनी त्यात सहभागी होता कामा नये. त्याचवेळी पतीने बिअर, भांग आणि मांस खाणाऱ्या महिलेसोबत राहायचे नसल्याचे सांगितले.
प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले तेव्हा पतीनेही वधू मुलगी नसून तृतीय पंथ असल्याचा आरोप केला. या प्रकरण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. सोशल मिडियावर देखील हे प्रकरण व्हायरल झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने नातेवाइकांना घरी बोलावून प्रकरण मिटवले.
संबंधित बातम्या