पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीने दिवसा केले करवा चौथचे व्रत अन् रात्री विष देऊन ठार मारले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीने दिवसा केले करवा चौथचे व्रत अन् रात्री विष देऊन ठार मारले

पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीने दिवसा केले करवा चौथचे व्रत अन् रात्री विष देऊन ठार मारले

Published Oct 21, 2024 07:30 PM IST

कौशांबीमध्ये करवा चौथच्या दिवशीच पत्नीने पतीची हत्या केली. प्रत्यक्षात पत्नीने मायक्रोनीमध्ये विष मिसळून पतीला खायला दिले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ती पळून गेली.

पत्नीकडून पतीची हत्या
पत्नीकडून पतीची हत्या

देशभरात आज करवा चौथचे व्रत साजरे केले गेले. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर अन्न व पाणी न घेता उपवास करते. पण कौशांबीमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने करवा चौथच्या दिवशी पतीची हत्या केली. पत्नीने रात्री उशिरा मायक्रोनीमध्ये विष मिसळून पतीला खायला दिले. ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्याला घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर पत्नी मायक्रोनी देऊन पळून गेली. मात्र, नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

नगरपंचायत दारानगर-कडधाम मधील लालबहादूर शास्त्री नगर (इस्माईलपूर) येथे ही घटना घडली. शैलेश सरोज (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेशचा पत्नी सविता सोबत वाद होत होता. चुकीच्या कृतींमुळे तो रागावला होता. 

रविवारी करवा चौथच्या दिवशी दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. यानंतर सविताने रात्री मायक्रोनीमध्ये विष मिसळून त्याला ठार मारल्याचा आरोप आहे. विषारी मायक्रोनी खाल्ल्यानंतर तरुणाची प्रकृती बिघडली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी शैलेशला इस्माईलपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताचा धाकटा भाऊ अखिलेश याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पतीला मायक्रोनी खाऊ घालून ही महिला घरातून पळून गेली. पोलीस तिची चौकशी करत आहेत. 

या प्रकरणी सिराथू पोलीस परिक्षेत्र अधिकारी अवधेश कुमार विश्वकर्मा यांनी सांगितले की, इस्माईलपूर गावातील रहिवासी शैलेश रविवारी रात्री जेवल्यानंतर अचानक बिघडला, त्यानंतर त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी जेवणात विष मिसळल्याची तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि १२३ (विषबाधा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर