मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ओम लिहिलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान! तरुणाला नग्न करून मारहाण

ओम लिहिलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान! तरुणाला नग्न करून मारहाण

Jan 25, 2024 09:35 AM IST

om written on saffron flag insulted in telangana : तेलंगणात भगव्या ध्वजाचा अपमान केल्याने एका तरुणाला नग्न करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गावकऱ्यांनी हिंदूंच्या भावना भडकावल्याप्रकरणी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ओम लिहिलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान! तरुणाला नग्न करून मारहाण
ओम लिहिलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान! तरुणाला नग्न करून मारहाण

om written on saffron flag insulted in telangana : तेलंगनामद्धे एक धक्कादायक घटना घडली आहे. ओम लिहिलेल्या ध्वजाचा अपमान केल्याबद्दल एका मुस्लिम तरुणाला नग्न करून मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. ही पोस्ट त्याने सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून शेअर केली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी तरूणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. गावकऱ्यांनी परस्पर विरोधी तसेच तरुणा विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! पुणे, मुंबई गारठले तर विदर्भात पावसाची शक्यता

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका रीलमध्ये एका मुस्लिम तरुणाने भगवा ध्वज हातात धरून अवमानकारक पद्धतीने दाखवला आहे. व्हिडीओमध्ये तो ध्वजासोबत आक्षेपार्ह वर्तन करतांना दिसत आहे. रिपोर्टनुसार, यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले असून मेडक जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या या तरुणाला लोकांनी पकडून त्याला नग्न करून मारहाण केली.

Talathi Bharati: महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालात घोळ? सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

धक्कादायक बाब म्हणजे संतप्त जमावाने त्याच्या गुप्तांगाला जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. हिंदूंच्या भावना भडकावल्याप्रकरणी गावकऱ्यांनी या तरुणा विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ (अ), २९५-ए, ५०५ (२) अन्वये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याठिकाणी तरुणाने देखील गावकऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गावकऱ्यांविरुद्ध कलम ३४१, ३२३, ५०५(२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या घटनेमुळे गावात तानावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन देखील केले आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर