Om Birla : इंडिया आघाडीनं दंड थोपटले खरे, पण एनडीएनं बाजी मारली! ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Om Birla : इंडिया आघाडीनं दंड थोपटले खरे, पण एनडीएनं बाजी मारली! ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड

Om Birla : इंडिया आघाडीनं दंड थोपटले खरे, पण एनडीएनं बाजी मारली! ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड

Jun 26, 2024 12:04 PM IST

om birla became lok sabha speaker : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून आवाजी मतदानाने भाजपचे ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांना लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा सभापती! आवाजी मतदानानं लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड
ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा सभापती! आवाजी मतदानानं लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

om birla became lok sabha speaker : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून आवाजी मतदानाने भाजपचे ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांना लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी ओम बिर्ला त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव मांडला. याला एन.के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिलं. मात्र, आवाजी मतदान घेत ओम बिरला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवलं. त्यांच्यासोबत हा पदभार घेतांना सर्व उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ओम बिर्ला म्हणाले की, पुन्हा एकदा लोकसभेचा अध्यक्ष होणे हे माझे भाग्य आहे. तर पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही दुसऱ्यांदा या जागेवर विराजमान झाले आहात, हे सभागृहाचे भाग्य आहे. तुम्हाला माझ्याकडून व या संपूर्ण सभागृहातील सदस्यांकडून अनेक शुभेच्छा. दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होणे ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. येत्या ५ वर्षात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल व या पदावर असतांना योग्य निर्णय घ्याल असा विश्वास आम्हा सर्वांना आहे, असे मोदी म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर