लोकसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक एडिडेट व्हिडिओ व्हायरल करून खोटे दावे केले जात आहेत. काँग्रस सत्तेत आल्यावर पाकिस्तानला ५० वर्षांसाठी बिनव्याजी ५ हजार कोटींचे कर्ज दिले जाईल, अशी राहुल गांधींनी घोषणी केल्याच्या दाव्यासह एबीपी न्यूजच्या बातमीचे ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या दाव्याची पडताळणी केल्यानंतर समजले की, व्हायरल ग्राफिक फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने प्रसिद्ध केलेली नाही.
व्हायरल पोस्टमधील एबीपी न्यूजचा लोगो आणि बातमीचे ग्राफिक दिसते. या बातमीमध्ये राहुल गांधी यांच्या नावासोबत त्यांनी केलेल्या दोन घोषणा लिहिलेल्या दिसतात.
1) पाकिस्तानला मदत करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते नक्कीच करू.
2) केंद्रात आमचे सरकार बनताच आम्ही पाकिस्तानला५० वर्षांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज बिनव्याजी देऊ.
युजर्संनी हे ग्राफिक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काँग्रेसचे सरकार आले तर पाकिस्तानला५ हजार कोटी रुपये बिन व्याजी स्वरुपात ५० वर्षासाठी दिले जाईल – राहूल गांधी.”
मूळ पोस्ट –फेसबुक
या व्हायरल दाव्याची पडताळणी केल्यानंतर सर्वप्रथम एबीपी न्यूजच्यावेबसाईटवर किंवा त्यांच्या सोशल मीडियाअकाउंटवर शोध घेतला असता,हे ग्राफिक आढळले नाही.
याच्या उलट एबीपी न्यूजने १२ नोव्हेंबर2018 रोजी ट्विट करून स्पष्ट केले होते की, एबीपीच्या नावाने व लोगो वापरून व्हायरल होत असलेली ग्राफीक फेक असून अशी बातमी एबीपी न्यूज कडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ऑनलाइन प्रसारित केले जाणारे संलग्न माध्यम आमच्या चॅनेलच्या टेम्पलेटशी जोडलेले आहे. राहुल गांधींच्या विधानांचे वृत्त एबीपीने जाहिर केलेले नाही. हे वृत एबीपी न्यूज नेटवर्कशी संबंधित नाही.”
या पडताळणीवरून यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक फेक आहे. एबीपी न्यूजने 2018 मध्येच स्पष्ट केले की, काँग्रस सत्तेत आल्यावर राहुल गांधी पाकिस्तानला बिनव्याजी 50 वर्षांसाठी 5 हजार कोटींचे कर्ज देतील अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने जाहीर केलेली नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक अनेक वर्षांपासून व्हायरल होते आहे.