Oil Tanker Sinks Off Oman Coast : ओमानच्या समुद्राजवळ एक दुर्घटना घडली आहे. ओमानच्या समुद्र किनारपट्टीवर एक तेलवाहतूक करणारे जहाज बुडाले आहे. या जहाजाच्या क्रू मध्ये १३ भारतीय होते. तर एकूण क्रू संख्या ही १६ होती. या जहाजाचे नाव प्रेस्टीज फाल्कन असे बुडालेल्या जहाजाचे नाव आहे. जहाजावरील इतर कर्मचारी हे श्रीलंकेचे रहिवासी आहेत. सागरी सुरक्षा केंद्राने (एमएससी) मंगळवारी याबाबत हे जाहाज बुडाल्या नंतर एका दिवसानंतर दिली. एमएससीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की कोमोरोस-ध्वज असलेला तेल टँकर रास मदारकाच्या आग्नेयेस २५ नॉटिकल मैल दूर असलेल्या बंदर शहराजवळ समुद्रात बुडाले.
या बाबत रॉयटर्सनं देखील वृत्त दिले आहे. तेलवाहू जहाज पाण्यात बुडाले असून ते पलटी झाले होते. हे जहाज पाण्यात पुन्हा स्थिर झाले की नाही? जहाज बुडाल्यानंतर समुद्रात त्यातून तेल गळती झाली आहे की नाही? याची माहिती अद्याप पुढे आली नाही. एलएसईजी कडील शिपिंगच्या माहितीवरुन या जहाजाची बांधणी ही २००७ मध्ये करण्यात आली आहे. हे जहाज ११७ मीटर लांबीचं असून यात प्रामुख्याने कच्चा तेलाची वाहतूक केली जाते. हे जहाज टँकर प्रकारातील जहाज आहे.
सागरी सुरक्षा केंद्रानं कोमोरोस ध्वजांकित तेल टँकर रास मद्राकाच्या दक्षिण पूर्वेस २५ नॉटिकल मेल येथे बुडाल्याचे संगितले आहे. या जहाजाचा शोध घेतला जात आहे.
ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचं केंद्र आहे. राज्यातील सर्वात मोठा सिंगर इकॉनॉमिक प्रकल्प, डुकमच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना देखील येथे आहे.या जहाजाचे नाव हे प्रेस्टिज फाल्कन आहे. शिपिंग वेबसाइट marinetraffic.com अर या जहाजाची माहिती देण्यात आली आहे. हे जहाज बुडल्याची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. सध्या तरी या जहाजातील तेल हे समुद्रावर पसरले असल्याची माहिती नाही. जर हे तेल समुद्रात मिसळले असून तर मोठ्या प्रदूषणाचा देखील धोका व्यक्त केला जात.
संबंधित बातम्या