Odisha train accident : 'सुरक्षा कवच' शिवाय धावली रेल्वे! ओडिशातील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर
Odisha train accident : रेल्वे दुर्घटनेनंतर आता एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. चालक किंवा इतर कुठल्या कारणांमुळे होणारी रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेलं सुरक्षा कवच हे बालासोरमध्ये अपघात झालेल्या रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आलेलं आलेलं नव्हतं, अशी माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली : ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेत तब्बल २८८ नागरिकांचा जीव गेला आहे. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चालक किंवा इतर कुठल्या कारणांमुळे होणारी रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेलं सुरक्षा कवच हे बालासोरमध्ये अपघात झालेल्या रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आलेली नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Odisha train accident : 'आधी रुळात गडबड, नंतर 'आरमर'ही निकामी'; दुर्घटनेमुळं रेल्वेच्या झीरो अपघात पॉलिसीवर प्रश्नचिन्ह
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २८८जणांचा मृत्यू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देणार आहेत. या भीषण दुर्घटनेवर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, या रेल्वे दुर्घटनेनंतर महत्वाची माहिती पुढे आली आहे. चालक किंवा इतर कुठल्या कारणांमुळे होणारी रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेलं सुरक्षा कवच यंत्रणा ही बालासोरमध्ये अपघात झालेल्या रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आलेली नव्हती अशी माहिती मिळत आहे. ही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) म्हणजेच 'कवच' यंत्रणा तीन भारतीय कंपन्यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आली होती.
Train Accident : ''कुणाचे हात कापले गेले, तर कुणाचे पाय'' ओडिशाच्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती
कवच म्हणजे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम आहे. ही यंत्रणा रिसर्च डिजाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायजेशनने (RSDO) विकसित केली आहे. या यंत्रणेच्या विकासासाठी २०१२ पासून रेल्वेने काम सुरू केलं होतं. त्यावेळी या प्रोजेक्टचं नाव Train Collision Avoidance Syste (TCAS) असं ठेवण्यात आलं होतं. या सुरक्षा कवचची पहिली चाचणी ही २०१४ मध्ये घेण्यात आली होती. त्याचा लाइव्ह डेमोही दाखवण्यात आला होता.
ही यंत्रणा अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रांनी मिळून बनवलेला एक संच आहे. यातील रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिवाइस असतात. हे डिवाइस ट्रेन, रेल्वे ट्रॅक, रेल्वे सिग्नल्स सिस्टिम आणि प्रत्येक स्टेशनवर एक किलोमीटर अंतरावर बसवण्यात येतं. ही यंत्रणा इतर यंत्रांशी अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे संपर्क करते.
एखाद्या ट्रेनच्या चालकाने सिग्नल तोडला तर कवच यंत्रणा अॅक्टिव्हेट होते. यानंतर ही कवच यंत्रणा चालकाला अलर्ट करते आणि ट्रेनच्या ब्रेकवर नियंत्रण मिळवते. एकाच ट्रॅकवर दुसरी ट्रेन धावत असेल तर ही यंत्रणा पहिल्या ट्रेनची वाहतूक थांबवते.
या सोबतच ही यंत्रणा रेल्वेच्या प्रत्येक हालचालीवर देखील नजर ठेवते आणि त्याचे सिग्नल मुख्य स्टेशनला पाठवते जर एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे आल्यास एका ठराविक अंतरावर या तंत्रज्ञानाद्वारे दोन्ही गाड्या आपोआप धांबविल्या जातात.
विभाग