Train Accident : ''कुणाचे हात कापले गेले, तर कुणाचे पाय'' ओडिशाच्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती-odisha train accident someone lost hand someone leg odisha train tragedy survivor recalls horror ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Train Accident : ''कुणाचे हात कापले गेले, तर कुणाचे पाय'' ओडिशाच्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती

Train Accident : ''कुणाचे हात कापले गेले, तर कुणाचे पाय'' ओडिशाच्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती

Jun 03, 2023 02:39 PM IST

Odisha Train Accident : शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला याची माहिती एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली.

 या भीषण अपघातात तीन रेल्वेगाड्या एकमेकांना धडकल्या असून या भीषण अपघातात तब्बल २३३ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. सकाळ होऊनही  बचावकार्यअद्याप थांबलेले नाही
या भीषण अपघातात तीन रेल्वेगाड्या एकमेकांना धडकल्या असून या भीषण अपघातात तब्बल २३३ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. सकाळ होऊनही बचावकार्यअद्याप थांबलेले नाही (HT_PRINT)

Odisha Train Accident : शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान धावते. यशवंतपूरहून येणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला त्याची धडक बसली. त्याचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर समोरून येणाऱ्या मालगाडीलाही धडक दिली.

 

या भीषण अपघाताची माहिती एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितली. त्याने त्याच्यावर बितलेला प्रसंग आणि ट्रेंन मधींन कथन केलेले भयावह दृश्य अंगांवर काटा आणणारे आहे. अपघातापूर्वी हा प्रवाशी झोपला होता. ट्रेन रुळावरून घसरल्यावर तो एका धक्क्याने जागा झाला. त्याने सांगितले की यानंतर अचानक १०-१५ लोक त्याच्यावर पडले आणि तो त्यांच्याखाली दबला गेला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा प्रवाशी म्हणाला, "अपघातापूर्वी मी झोपलो होतो. बोगीला धडक बसल्यावर मला जाग आली. मला काही कळायच्या आत १०-१५ लोक माझ्यावर पडले. अपघातात माझ्या हाताला आणि मानेला दुखापत झाली."

Odisha train accident: ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर, ९०० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला असेल असे विचारले असता तो म्हणाला की बोगीतून बाहेर पडल्यावर आजूबाजूला जखमी लोक दिसले. "कुणाचा पाय मोडला, कोणाचा हात तुटला. कोणाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली."

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तेही आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेज, सोरो आणि गोपाळपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले खाटापाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, दोन वर्षात पाचवी घटना

अजूनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकून असल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि इतर सर्व यंत्रणांकडून कालपासून बचावकार्य सुरू आहे. या अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या रेल्वेचे दोन डबे रूळावरून घसरले. बहानगा बाजारा स्थानकाजवळही ही घटना काल संध्याकाळी ७.१० वाजता घडली. बाजूच्या रेल्वे रूळावरून चेन्नईला जाणारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस वेगाने धावत होती. यावेळी कोरोमंडल एक्स्प्रेसने रूळावरून घसरलेल्या डब्यांना जोरात धडक दिली. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचे १२ डबे रूळावरून घसरले. रूळावरून घसरलेले डब हे बाजूला उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वत्र किंकाळ्या आणि वेदनांमुळे प्रवाशांचा आवाज ऐकू येत होता.

प्रवाशांचे छिन्नविछिन्न मृतदेह

रेल्वेच्या धडकेचा आवाज अतियश भयंकर होता. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी हात पाय नसलेले अनेक मृतदहे छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. अनेक नागरिक आपल्या जीवलगांना शोधत होते. अंगावर काटा आणणारे हे दृश्य वर्णन करण्यापलिकडे आहे, असं अपघाताच्या आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

 

Whats_app_banner
विभाग