Three died due to snake bite : ओडिशातील बौध जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील चौघांना साप चावला. सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर वडिलांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधीरेखा (वय १३), शुभरेखा मलिक (वय १२) आणि सौरभी मलिक (वय ३) अशी तीन बहिणींची नावे आहेत.
रविवारी रात्री ही घटना घडली. टिकरपाडा पंचायत अंतर्गत चरियापाली गावातील रहिवासी सुरेंद्र मलिक हे आपल्या कुटुंबासह झोपले होते. रात्री त्यांच्या मुलींची तब्येत बिघडू लागल्याने संपूर्ण कुटुंब जागे झाले. मुलींना श्वास घेण्यास त्रास होत होता. जवळच एक साप रेंगाळत असल्याचे सुलेंद्रने पाहिले. त्याने पत्नीला मदतीसाठी बोलावले. तत्काळ चौघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिन्ही मुलींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तर सुलेंद्रला बौद्ध जिल्हा रुग्णालयातून विमसार मेडिकल कॉलेज, बुर्ला येथे पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुलेंद्रची प्रकृतीही चिंताजनक आहे.
तिन्ही बहिणींना क्रेट सापाने दंश केला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ओडिशात दरवर्षी २५०० ते ६ हजार लोकांना साप चावतो. यापैकी दरवर्षी ४०० ते ९०० लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. २०२३-२४ मध्ये सर्पदंशामुळे किमान १०११ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यावर्षीही सर्पदंशामुळे ओडीशा येथे २४० जणांना जीव गेला आहे. ओडिशा सरकार सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देते.
क्रेट साप अत्यंत विषारी आहे. चावल्यानंतर काही तासांतच व्यक्तीचा मृत्यू होतो. सामान्य क्रेट कोब्रापेक्षा पाचपट जास्त विषारी आहे. त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. वास्तविक त्याच्या चाव्यामुळे फारसा त्रास होत नाही. अशा स्थितीत अनेकांना सुरुवातीला साप चावला असावा याची माहिती नसते. हा साप जमिनीवर झोपणाऱ्यांना जास्त चावतो. हा साप प्रामुख्याने रात्री बाहेर पडतो. शरीराची उष्णतेची सुगावा घेत हा साप चावा घेतो.