भाजप सरकारच्या सुभद्रा योजनेसाठी महिलांची गर्दी; अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना, काय आहेत योजनेचे फायदे?-odisha scheme women will get 50000 rs in five years all about subhadra yojna pm modi will launch ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भाजप सरकारच्या सुभद्रा योजनेसाठी महिलांची गर्दी; अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना, काय आहेत योजनेचे फायदे?

भाजप सरकारच्या सुभद्रा योजनेसाठी महिलांची गर्दी; अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना, काय आहेत योजनेचे फायदे?

Sep 16, 2024 04:48 PM IST

Subhadrayojna : १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी ओडिशाचा दौरा करणार आहेत. राज्य सरकारच्या सुभद्रा योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच वर्षांत ५० हजार रुपये दिले जातील.

सुभद्रा योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी
सुभद्रा योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी (HT_PRINT)

Subhadra yojna : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी सरकारी  योजना सुरू करणार आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी 'सुभद्रा योजना' सुरू करणार आहेत. तत्पूर्वी राज्यातील अंगणवाडी व जनसेवा केंद्राबाहेर महिलांची गर्दी होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक मोबाइल क्रमांकाशी आधार लिंक करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, अनेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले असून चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  

काय आहे सुभद्रा योजना?

राज्यातील २१ ते ६० वयोगटातील १ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने गेल्या महिन्यात केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना पाच वर्षांत ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये महिलांना १० हजार रुपये मिळतील, जे डीबीटीद्वारे आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ५००० रुपयांचा हप्ता आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ५००० रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे.

योजनेच्या उद्घाटनासाठी भुवनेश्वरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, योजना सुरू होण्यापूर्वीच ६० लाख  महिलांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी सरकारकडून सुभद्रा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय राज्य सरकारनेही या योजनेला भरपूर प्रसिद्धी दिली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी सरकारने सुभद्रा पदयात्रेचे ही आयोजन केले होते. मोहन मांझी सरकारने या योजनेसाठी पाच वर्षांत ५५ हजार ८२५ कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

बीजेडी सरकार कालिया योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपये खर्च करत असे. तर सुभद्रा योजनेला श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा यांचे नाव देण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपने महिलांना ५० हजार कोटींचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. असे मानले जाते की नवीन पटनायक यांना महिलांसाठी खूप पाठिंबा होता. मात्र, यावेळी भाजपने बाजी मारली. बीजेडीच्या प्रमिला मलिक यांनी या योजनेवर टीका केली आणि १०,००० रुपयांची रक्कम अपुरी असल्याचे म्हटले. भाजपने दोन वर्षांत महिलांना ५० हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तुम्हीच सांगा की ५ हजार रुपयांत कोणता बिझनेस सुरु करता येतो. भाजपने जनतेची फसवणूक केली असून केवळ मते मिळवण्यासाठी ही युक्ती वापरली असल्याची टीका बीजेडीने केली आहे.

Whats_app_banner