ओडिशामधील नवीन पटनायक सरकारने राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिला नोकरदारांना मोठी सवलत देताना सरकारने मंगळवारी घोषणा केली की, सरकारी विभागांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता १५ दिवसांच्या प्रासंगिक रजेशिवाय (casual leaves) वर्षाला १० दिवसांच्या अतिरिक्त आकस्मिक रजा मिळतील. सरकारने म्हटले आहे की, महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व अन्य समस्या लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे.
ओडिशामधील मुख्यमंत्री कार्यालयाने मंगळवारी म्हटले की, महिला सरकारी कर्मचाऱ्यांना घरगुती जबाबदाऱ्या व अन्य समस्या लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ९० च्या दशकात सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के महिलांना ३३ टक्के आरक्षणाची घोषणा करणारे ओडिशा देशातील पहिले राज्य होते.
मागच्या आठवड्यात, राज्य सरकारने महिला ब्लॉक अनुदान कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वासाठी १८० दिवसांच्या पगारी सुट्ट्यांची घोषणा केली होती. मागच्या महिन्यात राज्य सरकारने गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी एका राज्य कल्याणकारी योजनेची रक्कम दुप्पट करत ५ हजारवरून १० हजार रुपये केली होती. माता व शिशू मृत्यू दर कमी करण्यासाठी २०११ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा ६० लाखाहून अधिक गर्भवती महिला व मातांना याचा लाभ झाला आहे.
राज्य सरकारने नुकचेच विनाअनुदानित शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांच्या आकस्मिक सुट्टीची घोषणा केली होती.
सरकारसोबत मोठ्या खासगी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्या देतात. त्यामध्ये आजारपणाची सुट्टी (Sick Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), अर्जित रजा (Earned Leave), विशेष रजा (Privilege Leave) यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. या सुट्या तुम्हाला वर्षभरात घेता येतात.