मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Man Kills Wife: किरकोळ वादातून पत्नीला संपवलं, धड शेतात टाकून शीर घरी आणलं; पाहून संपूर्ण गाव हादरलं
Representative use
Representative use (HT_PRINT)

Man Kills Wife: किरकोळ वादातून पत्नीला संपवलं, धड शेतात टाकून शीर घरी आणलं; पाहून संपूर्ण गाव हादरलं

26 May 2023, 17:44 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Odisha Murder: ओदिशातील गजपती जिल्ह्यात एका व्यक्तीने किरकोळ वादातून पत्नीचे शीर धडापासून वेगळे केले.

Odisha Man Kills His Wife: ओदिशातील गजपती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून एका व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पत्नीचे धड शेतात टाकून शीर घरी घेऊन आला. हा संपूर्ण प्रकार पाहून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्मिला कारजी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, चंद्रशेखार कारजी आरोपीचे नाव आहे. दरम्यान, हे दाम्पत्य गुरुवारी सकाळच्या सुमारास सारा गावाजवळ असलेल्या शेतात गेले होते. त्यावेळी किरकोळ कारणांवरून त्यांच्या वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चंद्रशेखरने उर्मिला हिच्या मानेवर धारदार कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर उर्मिलाचे धड शेतात टाकून तिचे शीर घेऊन तो घरी पोहचला. त्याला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. चंद्रेशेखरनं घर गाठलं आणि पत्नीचं शिर दाराच्या समोर ठेवलं.

दरम्यान, घाबरलेल्या गावकऱ्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस चंद्रशेखरच्या घराजवळ पोहोचले. चंद्रशेखर अतिशय शांतपणे पत्नीच्या शिराजवळ बसलेला त्यांना दिसला. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखरकडे विचारपूस केली असता त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी शेतात जाऊन धड ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले.

उर्मिला ही चंद्रशेखरची दुसरी पत्नी आहे. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, चंद्रशेखरच्या या धक्कादायक कृत्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग