मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी नेमके आहेत कोण? त्यांची निवड का महत्त्वाची?

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी नेमके आहेत कोण? त्यांची निवड का महत्त्वाची?

Jun 12, 2024 11:05 AM IST

who is mohan charan majhi : ओडिशामध्ये प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपनं मुख्यमंत्रिपदासाठी मोहन चरण माझी यांची निवड केली आहे.

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी नेमके आहेत कोण? त्यांची निवड का महत्त्वाची?
ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी नेमके आहेत कोण? त्यांची निवड का महत्त्वाची?

who is mohan charan majhi : नवीन पटनायक यांनी तब्बल २४ वर्षे सत्ता गाजवल्यानंतर ओडिशाला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार मोहन चरण माझी यांची ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपचा हा आदिवासी चेहरा पुढची पाच वर्षे राज्याचं नेतृत्व करणार आहे. मोहन चरण माझी हे आहेत कोण जाणून घेऊया…

ट्रेंडिंग न्यूज

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी कोण आहेत?

मोहन चरण माझी यांनी ओडिशातील क्योंझर विधानसभा मतदारसंघात बिजू जनता दलाच्या मिनू माझी यांचा ११,५७७ मतांनी पराभव केला.

मोहन माझी हे आदिवासी समाजाचे प्रभावशाली नेते असून ते २००० मध्ये क्योंझर मतदारसंघातून ओडिशा विधानसभेवर निवडून गेले होते.

मोहन चरण यांनी याआधी २००० आणि २००४ मध्ये केंझर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर २०१९ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले होते.

२००० च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत मोहन चरण माझी यांनी क्योंझर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जगदीश नाईक यांचा २२,१६३ मतांनी पराभव केला होता.

२००४ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत मोहन चरण माझी यांनी क्योंझरमधून काँग्रेसचे उमेदवार माधव सरदार यांचा ११,००२ मतांनी पराभव केला होता.

मोहन चरण माझी यांना सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होता. २००९ मध्ये बीजू जनता दलाच्या उमेदवार सुवर्णा नाईक आणि नंतर २०१४ मध्ये बीजेडीचे उमेदवार अभिराम नाईक यांनी माझी यांचा पराभव केला होता.

आमदार म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

दांडगा जनसंपर्क, मतदारांशी असलेली बांधिलकी आणि प्रभावी नेतृत्व यामुळं ओडिशाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडं चालून आली आहे.

ओडिशा विधानसभेचं चित्र कसं आहे?

लोकसभा निवडणुकीबरोबरच ओडिशा विधानसभेची निवडणूक झाली. गेली २४ वर्षे ओडिशावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या बिजू जनता दलाला यावेळी भाजपनं कडवं आव्हान दिलं होतं. नवीन पटनायक सत्ता राखणार का याविषयी उत्सुकता होती. मात्र, भाजपनं बाजी मारली. विधानसभेच्या १४७ पैकी ७८ जागा जिंकून भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं. ओडिशात पहिल्यांदाच भाजपचं सरकार येत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या देखरेखीखाली झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन चरण माझी यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

WhatsApp channel
विभाग