उत्तराखंडमध्ये कोलकाताची पुनरावृत्ती, नर्सवर बलात्कार करून चेहरा दगडानं ठेचला, फोनच्या EMI नंबरमुळे सापडला आरोपी-nurse rape and murdered after robbery in uttarakhand ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उत्तराखंडमध्ये कोलकाताची पुनरावृत्ती, नर्सवर बलात्कार करून चेहरा दगडानं ठेचला, फोनच्या EMI नंबरमुळे सापडला आरोपी

उत्तराखंडमध्ये कोलकाताची पुनरावृत्ती, नर्सवर बलात्कार करून चेहरा दगडानं ठेचला, फोनच्या EMI नंबरमुळे सापडला आरोपी

Aug 15, 2024 09:16 PM IST

Uttarakhand Rape : नर्स ३० जुलैपासून बेपत्ता होती. तिचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह ८ ऑगस्ट रोजीयूपीतील बिलासपूर जिल्ह्यात झुडपात पडलेला आढळला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समजले की, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

नर्स बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला राजस्थानमधून अटक
नर्स बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला राजस्थानमधून अटक

कोलकातामध्ये महिला डॉक्‍टरवर बलात्कार व हत्या प्रकरणानंतर आता उत्‍तराखंडमध्येही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोप‍ला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्याच्या सीमेवर नर्स तस्लीम जहां हिला मारहाण करत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून तिच्या चेहरा छिन्नविछिन्न करत मृतदेह झुडपात टाकून दिला. त्यानंतर आरोपी महिलेकडील मोबाईल व पैसे घेऊन पसार झाला. 

नर्स ३० जुलैपासून बेपत्ता होती. तिचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह ८ ऑगस्ट रोजी यूपीतील बिलासपूर जिल्ह्यात झुडपात पडलेला आढळला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समजले की, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुजेज तपासले. त्याचबरोबर महिलेच्या फोनचा EMI नंबर सर्विलांसवर लावला. सीसीटीवी फुटेजमध्ये एक तरुण तिचा पाठलाग करताना दिसत होता. 

पोलिसांनी सर्विलांसकडून समजले की, फोनच्या EMI नंबरचे लोकेशन यूपीमधील बरेली येथील आहे. पोलिसांचे पथक तत्काळ बरेलीला रवाना झाले. तेथे समजले की, हा फोन तुरसापट्टी गावातील धर्मेंद्र यांची पत्नी खुशबू वापरत होती. चौकशीत समजले की, तिचा पती धर्मेंद्रही हा फोन वापरत होता. दोघेही घरातून पळून गेले होते. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर गेले व फोनची लोकशेन तपासत राहिले.

पोलिसांनी धर्मेंद्रची लोकेशन राजस्थानमधील जोधपूर येथे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना मंगळवारी पकडून देहरादूनला आणले. चौकशीत धर्मेंद्रने पोलिसांना सांगितले की, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो जाफरपूरमधील एका गव्हाच्या फॅक्ट्रीत काम करत होता. ३० जुलै रोजी सायंकाळी त्याला एका महिला एकटीच सुनसान रस्त्यावरून जाताना दिसली. त्यानंतर त्याने आपली बॅग खाली ठेवली व महिलेला पकडून तिचे तोंड दाबले तसेच तिला झुडूपात ओढत नेले. तिच्याकडील पैसे लुटून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्याजवळीस स्कार्पने तिचा गळा आवळला व तिला संपवले.

फोनच्या EMI नंबरमुळे आरोपी पकडला - 

महिलेकडील मोबाइल लूटल्यानंतर तिच्यावर रेप केला व ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा दगडाने ठेचला. बरेलीला जाऊन त्याने फोनमध्ये आपले सिमकार्ड टाकले व त्याचा वापर करू लागला. जेव्हा पोलिस आपल्या मागावर असल्याचे त्याला समजले तेव्हा तो रोजस्थानला पळून गेला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी धर्मेंद्रने आपला गुन्हा कबूल केला आहे.

विभाग