मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची उडाली तारांबळ; शोध सुरू

Viral News : नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची उडाली तारांबळ; शोध सुरू

Jun 28, 2024 01:16 PM IST

Viral News : गाझियाबादच्या मोहन नगर भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रस्त्याच्या मधोमध नग्न अवस्थेत फिरताना दिसत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची उडाली तारांबळ; शोध सुरू
नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची उडाली तारांबळ; शोध सुरू

Viral News : गाझियाबादच्या मोहन नगर भागात भर रस्त्यावर एक तरुणी रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुणी रस्त्याच्या मधोमध नग्न अवस्थेत फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोलिसांना मिळाल्यावर त्यांची तारांबळ उडाली असून ही महिला अशा अवस्थेत रस्त्यावर का फिरत होती, तसेच ही महिला कुठे गेली याचा तपास पोलिस करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

एसीपी साहिबाबाद रजनीश उपाध्याय यांनी सांगितले की, हा व्हिडिओ आमच्या पर्यंत आल्यावर आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठे काढण्यात आला आणि व्हिडिओतील महिला कोण होती आणि ती कुठे जात होती. याचा शोध घेण्यात येत आहे. तपासानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे उपाध्याय म्हणाले.

उपाध्याय म्हणाले की, मोहन नगर मेट्रो स्थानकाजवळ बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पाच दिवसांनंतरही अशी कोणतीही महिला रस्त्यावर फिरतांना आढळली नाही. तसेच या महिले बाबत काही माहिती मिळाली नाही. व्हिडिओमध्ये दाखवलेले लोकेशन देखील पोलिसांनी तपासले. तर त्यात बरेच बदल असल्याचे आढळून आले. व्हिडिओत दिसणारे रस्ते, डिव्हायडर इत्यादींमध्ये बरेच बदल होते. त्यामुळे हा व्हिडिओ सध्याचा नसून जुना आहे अशी शक्यता आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

बुधवारी रात्री सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओत एक महिला विवस्त्र अवस्थेत फिरत असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये महिला स्वत: झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील दिसत आहे. मात्र, व्हिडीओतील महिलेने तिचे केस व्यवस्थित केले होते. महिलेच्या विरुद्ध बाजूने एक व्यक्ती चालतानाही दिसत आहे. त्या व्यक्तीच्या हातात स्त्रीचे कपडे असावेत अशी शक्यता आहे.

१० सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ऑटो आणि इतर वाहनेही रस्त्यावर धावताना दिसत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ मोहननगर चौकाचा असल्याचं म्हटलं जात आहे, जिथे सतत लोकांची गर्दी असते. हा व्हायरल व्हिडिओ रात्रीचा आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.

ही महिला रस्त्याच्या मधोमध विवस्त्र का फिरत होती, याचा तपास पोलीस करत आहेत. हा व्हिडीओ कधीचा आहे याचाही शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासानंतर हा व्हिडिओ जुना असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

WhatsApp channel
विभाग