Government Job 2024: एनटीपीसी लिमिटेडने डेप्युटी मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एनटीपीसीची अधिकृत वेबसाइट ntpc.co.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेमुळे संस्थेतील २५० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीअंर्गत इलेक्ट्रिकल इरेक्शन, मेकॅनिकल इरेक्शन, सी अँड आय इरेक्शन आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार २८ सप्टेबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांची अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
१)इलेक्ट्रिकल इरेक्शन : ४५ पदे
२) मेकॅनिकल इरेक्शन : ९५ पदे
३) सी अँड आय इरेक्शन : ३५ पदे
४) सिव्हिल कन्स्ट्रक्शन : ७५ पदे
इलेक्ट्रिकल इरेक्शन: मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई/B.Tech पदवी.
मेकॅनिकल इरेक्शन: मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह मेकॅनिकल/ प्रॉडक्शनमध्ये बी.ई/B.Tech पदवी.
सी अँड आय इरेक्शन: पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई./ B.Tech पदवी.
सिव्हिल कन्स्ट्रक्शन: मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह सिव्हिल/ कन्स्ट्रक्शन मध्ये बी.ई/B.Tech पदवी.
निवड प्रक्रियेत पात्रता किंवा पदव्युत्तर अनुभवाच्या वर्षांच्या संख्येवर आधारित शॉर्टलिस्टिंग / स्क्रीनिंग, लेखी / संगणक-आधारित चाचण्या, वैयक्तिक मुलाखती इत्यादींचा समावेश असू शकतो.
सामान्य/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३००/- रुपये आहे. अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा ऑफलाइन पद्धतीने फी भरता येणार आहे.