NTET 2024 registration : राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NTET 2024 registration : राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

NTET 2024 registration : राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Published Oct 16, 2024 06:48 PM IST

National Teachers Eligibility Test : एनटीईटी २०२४ नोंदणीची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्याची थेट लिंक येथे दिली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा नोंदणीस मुदतवाढ
राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा नोंदणीस मुदतवाढ

NTET Registration 2024: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (NTET) २०२४  साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. जे उमेदवार या परीक्षेत बसण्यासाठी इच्छुक आहेत ते अधिकृत (exam.nta.ac.in) च्या माध्यमातून २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी करू शकतात. याआधी एनटीईटी २०२४ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर होती. 

एनटीईटी देशभरात सरकारी आणि खासगी शाळांत शिक्षक बनण्यास इच्छुक उमेदवारांसाठी एक प्रवेश परीक्षा आयोजित करत असते. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने एनटीईटी २०२४ नोंदणीची तारीख वाढवली आहे. इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन अँड होमिओपॅथी २०२४ साठी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. उमेदवार ntet.ntaonline.in किंवा exams.nta.ac.in/NTET या एनटीईटीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

२३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत परीक्षेसाठी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. करेक्शन विंडो २४ ऑक्टोबर ला उघडेल आणि २५ ऑक्टोबर २०२४ रोजी क्लोज होईल. या कालावधीत उमेदवार आपल्या अर्जात काही दुरुस्ती असल्यास करू शकतात.

एनटीईटी 2024 साठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक:  येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी कशी करावी

जे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात. 

  • ntet.ntaonline.in किंवा exams.nta.ac.in/NTET एनटीईटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर उपलब्ध एनटीईटी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांनी स्वतःची माहिती भरावी .
  • त्यानंतर अकाऊंटमध्ये लॉगिन करा.
  • अर्ज भरून परीक्षा शुल्क जमा करा.
  • सबमिट बटणावरवर क्लिक करा आणि पेज डाऊनलोड करा.
  • पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४०००/- रुपये, सामान्य-ईडब्ल्यूएस/ओबीसी-(एनसीएल) प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५००/- रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/थर्ड जेंडर उमेदवारांसाठी ३०००/- रुपये अर्ज शुल्क आहे.

परीक्षा बहुपर्यायी स्वरुपात होईल आणि १२० मिनिटे चालेल. परीक्षेत १०० प्रश्न असतील आणि जास्तीत जास्त मार्क १०० असतील. प्रश्नपत्रिका इंग्रजी किंवा हिंदीमध्ये सेट केली जाईल.

शिक्षकांची पात्रता भारतीय वैद्यक प्रणाली / होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल आणि कोणतीही व्यक्ती शिक्षकी पेशात दहा वर्षांच्या कालावधीत किंवा दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत रुजू होण्यास अपयशी ठरल्यास अशा व्यक्तींना पुन्हा एकदा भारतीय वैद्यक प्रणाली / होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर