CSIR-UGC-NET Exam : एनटीएनेने सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा केली स्थगित, कधी होणार परीक्षा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CSIR-UGC-NET Exam : एनटीएनेने सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा केली स्थगित, कधी होणार परीक्षा?

CSIR-UGC-NET Exam : एनटीएनेने सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा केली स्थगित, कधी होणार परीक्षा?

Jun 22, 2024 12:13 AM IST

NTA postponed the Joint CSIR-UGC-NET Examination : एनटीएने सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा 'अपरिहार्य परिस्थिती' आणि 'लॉजिस्टिक समस्या' मुळे पुढे ढकलली आहे.

सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा  स्थगित
सीएसआयआर-यूजीसी नेट परीक्षा  स्थगित (HT file)

सीएसआयआर यूजीसी-नेट परीक्षा अपरिहार्य परिस्थिती आणि लॉजिस्टिक समस्यांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी केली. उमेदवारांना सूचित  केले जाते की २५ ते २७ जून २०२४ दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा जून-२०२४ अपरिहार्य परिस्थिती तसेच लॉजिस्टिक समस्यांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे. या परीक्षेच्या आयोजनाचे सुधारित वेळापत्रक नंतर अधिकृत वेबसाइटद्वारे जाहीर केले जाईल, असे एनटीएने एका निवेदनात म्हटले आहे. 

सहाय्यक प्राध्यापकांची पात्रता, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील पीएचडी अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारी यूजीसी-नेट परीक्षा शिक्षण मंत्रालयाने रद्द केली आहे. यूजीसी-नेट परीक्षेचा पेपर डार्कनेटवर लीक झाला होता आणि तो रद्द करावा लागला होता,  अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असतानाच हा प्रकार घडला आहे. ५ मे रोजी ४,७५० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यात सुमारे २४ लाख विद्यार्थी बसले होते.  १४ जून रोजी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते, पण लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आधीच पूर्ण झाल्याचे एनटीएने म्हटले होते. 

Hajj Yatra 2024: हज यात्रेदरम्यान ६४५ लोकांचा मृत्यू; ६० हून अधिक भारतीयांचा समावेश; काय आहे कारण?

'नीट'च्या निकालात एनटीएच्या इतिहासात अभूतपूर्व असे ६७ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले असून, हरियाणातील फरिदाबाद येथील एका केंद्रातील सहा विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश झाल्याने गैरव्यवहाराबाबत संशय निर्माण झाला आहे. ग्रेस मार्क्समुळे ६७ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

६ जुलैपासून सुरू होणारी नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सहा केंद्रांवर वेळेचा अपव्यय भरून काढण्यासाठी यापूर्वी ग्रेस मार्क्स देण्यात आलेल्या १५६३ उमेदवारांची वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी रविवारी फेरपरीक्षा घेण्याची तयारी केली आहे. 

काय आहे एनटीए?
भारतीय सोसायटी रजिस्ट्रेशन अधिनियम, १८६० नुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेले राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) एक स्वायत्त संस्था आहे. अनेक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. एजन्सीची अध्यक्षता एचआरडी मंत्रालय द्वारे नियुक्त एक शिक्षण तज्ज्ञ करत असतो. सध्या या संस्थेचे अध्यक्ष यूपीएससीचे माजी अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आहेत. एनटीए एनईईटी, जेईई, सीटीईटी, गेट, जीपॅट, जीमॅट, कॅट आणि यूजीसी-नेट आदि परीक्षांचे आयोजन करते.

काय आहे UGC-NET परीक्षा?
सर्व यूनिवर्सिटी आणि कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक किंवा जूनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्रोफेसरच्या पात्रतेसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. जेआरएफ आणि असिस्टंट प्रोफेसरची पात्रता यूजीसी-नेट पेपर- I आणि पेपर- II मधील गुणांच्या आधारावर निश्चित होते. जे उमेदवार केवळ सहायक प्रोफेसर पदासाठी पात्र होतात त्यांना त्यानंतर सहायक प्रोफेसर बनण्यासाठी संबंधित यूनिवर्सिटी, कॉलेज किंवा राज्य सरकारच्या भरती नियमांचे पालन करावे लागते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर