NET Exam date : स्पर्धा परीक्षांच्या आयोजनातील कथित अनियमिततांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट परीक्षा रद्द केली होती. या मुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुढे ढकलण्यात आलेल्या नेट परीक्षेच्या नव्या तारखा विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या आहेत. यूजीसी-नेट परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा १८ जून रोजी घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षा रद्द करण्यात आली होती. नेट पेपर फुटल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाला मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी नेट परीक्षा रद्द केली होती. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आली होती. दरम्यान, रद्द झालेल्या यूजीसी नेट परीक्षेची नवी तारीख एनटीएने जाहीर केल्या आहेत. नव्या तारखानुसार ही ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर घेतली जाणार आहे. रद्द झालेल्या परीक्षेला देशभरातून ९ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापा होता. ही परीक्षा पुन्हा कधी होणार, याची विचारणा विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की, नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाली होती. हा पेपर टेलिग्राम अॅपवर देखील प्रसारित करण्यात आला होता. या पेपरफूटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.
यूजीसी-नेट ही ज्युनिअर रिसर्च फेलोशिप देण्यासाठी, सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा आहे. नेट परीक्षेच्या पूर्वीच्या पॅटर्नमध्ये बदल करत ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि एकाच दिवशी घेण्यात आली. मात्र, १५ दिवस चालणाऱ्या संगणक आधारित चाचणीच्या पूर्वीच्या पॅटर्ननुसारच ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यूजीसी-नेट परीक्षा घेण्यातील कथित गैरव्यवहारामुळे सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढे ढकलण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा आता २५ जुलै ते २७ जुलै या दरम्यान होणार आहे. आयआयटी, एनआयटी, आरआयई आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे किंवा संस्थांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
संबंधित बातम्या