Viral News : स्त्री-पुरुष संबंधातून मुले जन्माला येतात. पण, दोन पुरुष एकत्र येऊन मुलाला जन्म देऊ शकतात का? आईशिवाय बाळाला जन्म देणे शक्य आहे का? हा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे हे शक्य असल्याचा दावा करत असले तरी आता पर्यंत हा प्रयोग यशस्वी झालेला नाही. मात्र, चीनमध्ये एका ऐतिहासिक प्रयोगामुळे हे शक्य असल्याचा दावा केला जात आहे. या प्रयोगात चीनी शास्त्रज्ञांनी दोन नर प्रजनन करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध केलं आहेय. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. हा प्रयोग इतका का महत्त्वाचा का आहे जाणून घेऊयात.
चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे (सीएएस) मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट शी कुन ली यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या चमूने स्टेम सेल इंजिनीअरिंगचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. जैविक आईशिवाय उंदराच्या पिल्लाला जन्म देण्याचा हा पहिलाच प्रयोग नाही. या पूर्वी जपानी शास्त्रज्ञांंनी २०२३ मध्ये असाच प्रयोग यशस्वी केला होता. परंतु, जन्माला आलेल्या उंदराचे आयुष्य मर्यादित होते. यावेळी मात्र, चीनमधील शास्त्रज्ञांच्या या प्रयोगात यश आले आहे. ज्यात दोन नर उदंरांनी एका पिल्लाला जन्म दिला. तसेच त्याला लहानाचे मोठे सुद्धा केले.
पुरुषांच्या स्टेम सेल्सपासून अंडी बनविण्याचे यापूर्वीचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सरोगसीच्या माध्यमातून जैविक आईशिवाय मुलांचा जन्म होणे शक्य असले तरी या प्रक्रियेत अनेक आव्हाने आहेत. चीनमधील या ऐतिहासिक प्रयोगातून जन्माला आलेले उंदीर स्वतंत्रपणे प्रजनन करण्यास सक्षम आहे तसेच इतर तत्सम प्राण्यांपेक्षा जन्माला आलेल्या पिल्लाची तब्येत चांगली आहे. त्यात आरोग्याच्या कोणत्याही समस्या आढळून आल्या नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
लक्षात घेणे महत्वाचे आहे की या अभ्यासात जन्माला आलेल्या या उंदरांची इतर पिल्ले ही जगू शकली नाही. जन्माला आलेली ९० टक्के पिल्लांचा मृत्यू झाला. हा प्रयोग मानवांवर करण्यासाठी आणखी काही प्रयोग यशस्वी करावे लागणार आहे. तथापि, संशोधकांचा असा विश्वास आहे की या प्रयोगामुळे मानवांमधील काही अनुवांशिक मानसिक विकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.
चिनी शास्त्रज्ञांचा हा प्रयोग म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठे यश आहे. तथापि, हा प्रयोग मानवांवर करण्यापूर्वी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. हे संशोधन भविष्यात प्रजनन तंत्रज्ञानाला नवी दिशा देऊ शकते.
संबंधित बातम्या