मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅक होऊ शकते, मी यावर अभ्यास केलाय; सॅम पित्रोदा यांचा दावा

Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅक होऊ शकते, मी यावर अभ्यास केलाय; सॅम पित्रोदा यांचा दावा

Jun 17, 2024 01:21 PM IST

Sam Pitroda on EVM hacking : लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा हक्क कायद्यावर वादग्रस्त विधान करणारे कॉँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करत ईव्हीएम प्रणाली योग्य नाही आणि त्यात त्रुटी असू शकतात व ते हॅक केले जाऊ शकते असे विधान केले आहे.

ईव्हीएममध्ये हॅक केली जाऊ शकते, यावर अभ्यास केला आहेल; सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
ईव्हीएममध्ये हॅक केली जाऊ शकते, यावर अभ्यास केला आहेल; सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Sam Pitroda on EVM hacking : लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा हक्क कायद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या सॅम पित्रोदा यांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम प्रणाली चांगली नसून बॅलेट पेपर पद्धतीने निवडणुका घेणे चांगले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. पित्रोदा म्हणाले की, मत पत्रिकाद्वारे मतमोजणी करून विजय-पराजय ठरवणे ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. सॅम पित्रोदा यांनी एक्सवर लिहिले की, 'मी ६० वर्षांहून अधिक काळ इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम सारख्या क्षेत्रात काम केले आहे. मी ईव्हीएम प्रणालीचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते तसेच ते हॅक केले जाऊ शकते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापर करून निवडणुका घेणे उत्तम, असे पित्रोदा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम हॅक झाल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिले आहे. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईव्हीएम ही पूर्णपणे वेगळी प्रणाली आहे. हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेले नाही. यामुळे ते हॅक करता येत नाही. याशिवाय, ते अनलॉक करण्यासाठी ओटीपी आवश्यक असल्याचा दावाही खोटा आहे. दरम्यान, ईव्हीएमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका मीडिया रिपोर्टवरून हा वाद सुरू झाला आहे. त्यात दावा करण्यात आला होता की, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने त्यांच्या मोबाईलला ईव्हीएम जोडले होते. मत मोजणीच्या दिवशी निवडणुकीचे निकाल येत असतांना रवींद्र वायकर यांचा ४८ मतांनी थोड्याफार फरकाने विजय झाला होता. अशाप्रकारे मोबाईलद्वारे मशीन हॅक करून निकाल बदलल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावरुन आता वाड वाढतांना दिसत आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ईव्हीएममध्ये ओटीपीसारखी कोणतीही यंत्रणा नसल्याचे सांगितले आहे.

जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्कनेही ईव्हीएम हॅक होण्याचा केला आहे दावा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) धक्कादायक दावा केला आहे. एलोन मस्क म्हणाले की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचा वापर थांबवायला हवा. ऐवढेच नाही तर अमेरिकन निवडणुकांमधून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी देखील त्यांनी केली. स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी हे व्यक्तव्य अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद भारतात देखील उमटले आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर