Nitin Gadkari on delhi pollution : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील गंभीर वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. 'राजधानीत येण्यापूर्वी प्रत्येक वेळी मला विचार करावा लागतो की मी इथे यावं की नाही. जर मी दिल्लीत दोन दिवस राहिलो तर मी आजारी पडतो. दिल्लीत एवढं भयंकर प्रदूषण आहे.
'एनर्जी ट्रान्झिशन अँड सस्टेनेबल रोड ट्रान्सपोर्ट' या विषयावरील कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी एका अहवालाच उदाहरण देत दिल्लीच्या तीव्र वायू प्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असून प्रदूषणाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याचं देखील गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलतांना दिल्लीतील प्रदूषणाविषयी बोलतांना म्हणाले, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो. ते पुढे म्हणाले, "मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये कारण येथे इतके भयंकर प्रदूषण आहे. खेडय़ातून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांकडे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी वाहताना दिसत आहे, पण ते फक्त सांडपाणी आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि बायो-सीएनजी आणि इतर पर्यायी इंधनांचा अवलंब करणे हा वायू प्रदूषण कमी करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी दिल्लीतील चार जुन्या लँडफिल साइट्सला पर्यटनस्थळे म्हणून घोषित केले. वाढते प्रदूषणाची ही परिस्थिती शहरासाठी लज्जास्पद असल्याचे देखील गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, गेल्या चार वर्षांत आम्ही दिल्लीती प्रक्रिया केलेला कचरा हा महामार्ग प्रकल्पांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तयार होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण देखील नीट केले जात नाही. दिल्ली महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत.
संबंधित बातम्या