कामाच्या तासावरून अमेरिकेतही वादाची ठिणगी; एलॉन मस्क यांचा आठवड्यात १२० तास काम करण्यावर जोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कामाच्या तासावरून अमेरिकेतही वादाची ठिणगी; एलॉन मस्क यांचा आठवड्यात १२० तास काम करण्यावर जोर

कामाच्या तासावरून अमेरिकेतही वादाची ठिणगी; एलॉन मस्क यांचा आठवड्यात १२० तास काम करण्यावर जोर

Feb 04, 2025 11:41 AM IST

Elon Musk starts 120 hours work debate : जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी आता आठवड्यातून १२० तास काम करण्यावर जोर दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताप्रमाणे अमेरिकेतही कामाच्या वेळेवर वादंग होण्याची शक्यता आहे.

कामाच्या तासावरून भारताप्रमाणे अमेरिकेतही होणार वाद! एलॉन मस्क यांचा आठवड्यात १२० तास काम करण्यावर जोर
कामाच्या तासावरून भारताप्रमाणे अमेरिकेतही होणार वाद! एलॉन मस्क यांचा आठवड्यात १२० तास काम करण्यावर जोर

Elon Musk starts 120 hours work debate : डोनाल्ड ट्रम्प हे नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहे. त्यांच्या हा कार्यकाळ अनेक अर्थांनी वेगळा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामापासून ते बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यापर्यंतचा त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे.  सरकारी खात्यांमधील कामाचा वेग वाढविण्याची जबाबदारी त्यांनी थेट उद्योगपती एलॉन एलन मस्क यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, कामाच्या वेळांवरून भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. आता एलॉन मस्क यांनी आठवड्यातून १२० तास काम करण्याचं समर्थन केलं असून त्यामुळे अमेरिकेत देखील यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. 

 टेस्ला, एक्स सारख्या कंपन्यांचे मालक असलेल्या एलॉन मस्क हे त्यांच्या  विलक्षण  कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात.  एलॉन मस्क यांनी आता सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाधिक काम करण्यास शिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे, ज्याबद्दल सध्या जगभरात चर्चा होत आहे. त्यांनी अमेरिकन नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असे काम सुरू राहिले तर सरकारला यश कसे मिळेल, असा सवाल केला.

काय आहे प्रकार ? 

भारतात आठवड्यातून केवळ ७० ते ९० तास काम करण्याच्या मुद्यावरून मोठे वादळ निर्माण झाले होते.  यापूर्वी एल अँड टीच्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, ते आठवड्यातून ९० तास काम करतात. शेवटी किती दिवस घरी बसून बायकोकडे बघणार? जास्तीत जास्त वेळ काम कसं करायचं याचा विचार करायला हवा. त्यांच्या या वक्तव्या वरून मोठे वादळ उठले होते. त्यांच्यावर मोठी टीका देखील केली गेली होती. मात्र, आता एलॉन मस्क यांनी आमचा सरकारी कार्यक्षमता विभाग आठवड्यातून १२० तास काम करणार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेतील  नोकरशाही वर्ग आठवड्यातून केवळ ४० तास काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं असून अशांना थेट माघारी पाठवलं जाणार आहे. 

या पोस्टमध्ये मस्क यांनी ते व त्यांचा विभाग आठवड्यातील १२० तास काम करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यांनी दिवसा १७ तास तर आठवड्यात १२० तास  काम करण्यावर जोर दिला आहे. अमेरिकेतील  सरकारी कर्मचारी आणि नोकरशहा मात्र, वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मस्क यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना रोज १७ तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. एलन मस्क यांचा सरकारी कार्यक्षमता विभाग अनेक प्रकरणे हाताळत आहे. याशिवाय सरकारी विभागांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, याबाबतही ते सल्ला देत आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अमेरिकनांना मदत केल्याबद्दल नोकरशहांना जबाबदार धरले पाहिजे. तर काही नेटकऱ्यांनी  मस्क यांचे कौतुक करत, हेच आहे त्यांच्या यशाचे रहस्य असल्याचं म्हटलं आहे.  तर एका व्यक्तीने लिहिलं की,त्यांच्या या कामाच्या पद्धतीनमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहेत.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर