एक्सप्रेसला पुन्हा घातपात घडवण्याचा प्रयत्न? रेल्वे रुळांवर आढळला ७ मीटर लांबीचा लोखंडी रॉड; गुन्हा दाखल-now an attempt to overturn doon express in rampur seven meter long pole placed on the track ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एक्सप्रेसला पुन्हा घातपात घडवण्याचा प्रयत्न? रेल्वे रुळांवर आढळला ७ मीटर लांबीचा लोखंडी रॉड; गुन्हा दाखल

एक्सप्रेसला पुन्हा घातपात घडवण्याचा प्रयत्न? रेल्वे रुळांवर आढळला ७ मीटर लांबीचा लोखंडी रॉड; गुन्हा दाखल

Sep 19, 2024 08:54 PM IST

याच महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न झाला होता. आता रामपूर-काठगोदाम मार्गावर रुद्रपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सात मीटर लोखंडी रॉड ठेऊन काठगोदाम-देहरादून एक्सप्रेस ट्रेनला अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला.

रेल्वे रुळावर लोखंडी पोल आढळला.
रेल्वे रुळावर लोखंडी पोल आढळला. (ANI)

आता यूपी-उत्तराखंड बार्डरवर रेल्वेला घातपात करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. रामपूर-काठगोदाम मार्गावर रुद्रपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सात मीटर लोखंडी रॉड ठेऊन काठगोदाम-देहरादून एक्सप्रेस ट्रेनला अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. लोको पायलटने लांबवरून हा रॉड पाहून इमर्जन्सी ब्रेक दाबून गाडी थांबवली. या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. हा लोखंडी खांब हटवून ट्रेन रवाना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तसेच जीआरपी एसपी यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.

रेल्वे रुळांवर सहा मीटर लांबीचा लोखंडी रॉड आढळल्याने घातपाताचा प्रकार समोर आला आहे. लोको पायलटने रॉड पाहिल्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लावल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रेल्वे रुळावरून घसरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ही घटना घडली.

बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गाडी नंबर १२०९१ च्या लोको पायलटने रुद्रपूर सिटीच्या स्टेशन मास्तरांना कळवले की, बिलासपूर रोड ते रुद्रपूर सिटी दरम्यान किमी ४३/१०-११ वर रुळपूर रोड ते रुद्रपूर सिटी दरम्यान ट्रॅकवर ६ मीटर लांबीचा लोखंडी खांब आढळला. ड्रायव्हरने ट्रेन थांबवली, रुळ मोकळा केला आणि त्यानंतर ट्रेन सुखरूप पुढे रवाना झाली, असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे.

रामपूरच्या जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये रेल्वे कायदा १९८९ च्या कलमान्वये अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, विजेचा खांब पाहताच लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली आणि पोल हटवल्यानंतर ट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू केला.

याच महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात मालगाडी रुळावरून डिरेल करण्याचा प्रयत्न झाला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या रुळांवर चोरट्यांनी सिमेंटचे दोन ब्लॉक लावले होते. रेल्वे सिमेंट ब्लॉकवर आदळली पण कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

काही गुंडांनी रविवारी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर रुळांवर दोन सिमेंटब्लॉक लावले. एका मालगाडीने त्यांना धडक दिली, अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. फुलेरा-अहमदाबाद मार्गावर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या सारधना आणि बनगड स्थानकांदरम्यान ही घटना घडली.

तत्पूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भिवानी-प्रयागराज कालिंदी एक्स्प्रेस मार्गावर पेट्रोल आणि माचिसच्या बाटलीसह एलपीजी सिलिंडर रुळावर ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भिवानी-प्रयागराज कालिंदी एक्स्प्रेसच्या चालकाला सिलिंडर दिसल्याने अपघात टळला होता.

Whats_app_banner