मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्नाच्या वाढदिवशी दिलं नाही गिफ्ट, पत्नीने झोपलेल्या पतीने चाकूने केले सपासप वार

लग्नाच्या वाढदिवशी दिलं नाही गिफ्ट, पत्नीने झोपलेल्या पतीने चाकूने केले सपासप वार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 05, 2024 08:19 PM IST

Bengaluru News : लग्नाच्या वाढदिवशी पतीने काहीच गिफ्ट आणलं नसल्याने पत्नीच्या अंगाचा तिळपापड झाला अन् तिनं पतीवर हल्ला केला.

पत्नीने झोपलेल्या पतीने चाकूने केले सपासप वार
पत्नीने झोपलेल्या पतीने चाकूने केले सपासप वार

बंगलुरु शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने पतीवर चाकू हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पत्नीने  झोपलेल्या पतीवर चाकूने वार करत त्याला रक्तबंबाळ केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. 

मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. पत्नी हाउस वाइफ आहे. पोलिसांनी सांगितले की, दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यादिवशी पती आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसादिवशी गिफ्ट घेऊन आला नाही. यामुळे चिढलेल्या पत्नीने चाकूने हल्ला करत पतीला जखमी केले.

गिफ्ट न मिळाल्याने पत्नी चांगलीच संतापली. संतापाच्या भरात तिने धक्कादायक पाऊल उचललं. पती घरी कामावरुन परतल्यानंतर जेवण करून झोपी गेला. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हेच त्याच्या डोक्यात आलं नाही. पतीने काहीच गिफ्ट आणलं नसल्याने पत्नीच्या अंगाचा तिळपापड झाला अन् तिनं पतीवर हल्ला केला. 

पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांच्या मदतीने जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. १ मार्च रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित व्यक्तीने सांगितले की, शेजाऱ्यांमुळे त्याचा जीव वाचला.

लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संतापाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केल्याची  कबुली  पत्नीने पोलिसांसमोर दिली आहे. तर पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आजोबांच्या मृत्यूमुळे लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नव्हता, असं सांगितलं. पीडित पतीच्या तक्रारीवरून  पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग