Nostradamus Predictions : नवीन वर्ष ठरणार भयंकर! नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्याने जगाची चिंता वाढवली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nostradamus Predictions : नवीन वर्ष ठरणार भयंकर! नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्याने जगाची चिंता वाढवली

Nostradamus Predictions : नवीन वर्ष ठरणार भयंकर! नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्याने जगाची चिंता वाढवली

Jan 01, 2024 07:55 AM IST

Nostradamus Predictions 2024: रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल हमास संघर्षामुळे जग चिंतेत असताना आता २०२४ वर्ष सुध्दा भयंकर जाणार आहे. भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसने २०२४ चे भविष्य वर्तवले असून हे वर्ष अत्यंत भयानक असेल.

Nostradamus Predictions for 2024
Nostradamus Predictions for 2024

Nostradamus Predictions for 2024 : जगाने २०२३ वर्षाला निरोप देत नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत केले आहे. नवीन वर्ष सर्वात आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये साजरे करण्यात आले. या ठिकाणी लोकांनी मोठ्या फटाक्यांची आतषबाजी करून आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत केले.२०२४ वर्ष शांततेचे आणि सुखाचे जावो ही अपेक्षा असतांना आता एका भविष्यवाणीने जगाची चिंता वाढवली आहे.

lpg cylinder price : नव्या वर्षाचे गिफ्ट! तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलिंडर

२०२३ जाऊन आता २०२४ आले आहे. गेल्या वर्षात जगाने अनेक संघर्ष पहिले. मात्र, रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास युद्धाने जगाचे टेन्शन वाढवले होते. गेले वर्ष हे युद्धाचे वर्ष ठरले असताना काही देश नवीन वर्ष हे शांततेत जाईल अशी आशा करत होते. मात्र, २०२४ ची भविष्यवाणी पुढे आली असून यामुळे चिंता वाढली आहे. १६ व्या शतकातील फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस यांनी २०२४ ची भविष्यवाणी केल आहे.

Vasai station : महिला डब्यात आढळली बेवारस बॅग! बॉम्बच्या अफवेने वसई स्टेशनवर संपूर्ण ट्रेन केली रिकामी

राजा आणि पोप बदलतील का?

२०२४ मध्ये जगाला नवा पोप मिळेल, असे भाकीत नॉस्ट्रॅडॅमस यांनी केले होते. पोप फ्रान्सिस जगाचा निरोप घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले. त्याने असे भाकीत केले की राजा चार्ल्सची जागा कोणीतरी घेईल ज्याच्याकडे राजा असण्याचा कोणताही मागमूस नसेल. आता यामुळे प्रिन्स हॅरी सिंहासनावर विराजमान होऊ शकतील अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र, नवे राजा प्रिन्स हॅरी असेल की अन्य कोणी असेल, याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती नाही. विशेष म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या निधनाची भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने अचूकपणे केली होती.

अमेरिका चीन संघर्ष

नॉस्ट्रॅडॅमसनेही युद्धाची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या मते, चीन हिंदी महासागरात युद्ध करेल. मात्र, सुरक्षा तज्ज्ञांच्या हवाल्याने काही रिपोर्ट्समध्ये चीनला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे. याशिवाय २०२४ मध्ये पृथ्वीवर दुष्काळ आणि पूर येण्याचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून लागल्या रांगा

अमेरिकेत अंतगर्त कलह

अमेरिकेत सध्या पूर्वीपेक्षा जास्त अंतर्गत कलह पहायला मिळत आहेत. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेला अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत गृहयुद्ध येऊ शकते अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे.

२०२३ ला निरोप देताना, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली. येथे लोकांनी मोठ्या फटाक्यांची आतषबाजी करून आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे पहिले नवीन वर्ष साजरे करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडले.

नागरिक रेस्टॉरंट, पब, डिस्को आणि सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करून आनंद साजरा करताना दिसले. घड्याळात बाराचा ठोका पडताच नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर दोन ऑस्ट्रेलियात सर्वात आधी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले. ऑस्ट्रेलियातील टोंगा बेटावरही प्रथमच नवीन वर्ष साजरे करण्यात आले. टोंगा बेट आणि भारतामध्ये सुमारे साडेसात तासांचा फरक आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर