Russia Ukraine war viral news: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये तीन वर्षे पूर्ण होत आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी पराभव स्वीकारलेला नाही. रशिया आणि उत्तर कोरियात एक सैन्य करार झाला असून या करारा अंतर्गत उत्तर कोरियाचे सैन्य हे युक्रेनविरोधात लढण्यासाठी रशियात आले आहे. मात्र, उत्तर कोरियाच्या या सैनिकांना पोर्न पाहण्याचं व्यसन लागलं आहे. दिवसाचा मोठा वेळ पोर्न व्हिडिओ पाहण्यात हे सैनिक घालवत असल्याने ते लढण्यास असमर्थ असल्याचं बोललं जात आहे. उत्तर कोरियात इंटरनेटवर बंदी असल्यामुळे त्यांनी असं कधी काही पाहिलं नव्हतं. पण रशिया आणि युक्रेनमधील इंटरनेट आणि विविध साइट्सवर कोणतेही निर्बंध नसल्याने त्यांना इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय लागली असल्याचं बोललं जात आहे.
फायनान्शिअल टाईम्सचे परराष्ट्र व्यवहार भाष्यकार गिदोन रचमन यांनी एक्स-पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "विश्वसनीय सूत्रांनी मला सांगितलं आहे की, रशियात तैनात असलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांनी यापूर्वी कधीही इंटरनेट वापरले नव्हते. त्यामुळे आता रशियात ते पोर्नोग्राफीचा भरपूर आनंद घेत आहेत. उत्तर कोरियाच्या १० हजार सैनिकांच्या दिनचर्येवर इंटरनेटचा मोठा परिणाम झाला असल्याच रचमन यांनी सांगितलं नसलं तरी उत्तर कोरियाचे सैनिक आता अश्लील साहित्याचा देखील जास्त वापर करत असल्याचा दावा त्यांनी सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल चार्ली डायट्झ यांना उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुतिन यांच्या सैनिकांशी लढण्यासाठी पाठवलेल्या सैनिकांना लागलेल्या या नव्या सवयींविषयी विचारले असता ते म्हणाले की, ते "इंटरनेट व्यसन आणि त्या सैनिकांना पोर्न व्हिडिओ पाहण्याच्या लागलेल्या सवईबाबत काही बोलू शकत नाही.
रशियाने युक्रेंन विरोधात लढण्यासाठी उत्तर कोरियाच्या सैन्याला देशात पाचारण केलं आहे. तब्बल ७ हजार उत्तर कोरियायी सैनिक रशियात दाखल झाले आहेत. एका लष्करी करारा अंतर्गत हे सैनिक लढणार आहेत. लेफ्टनंट कर्नल चार्ली डायट्झ म्हणाले, रशियाच्या लष्करी कारवाईत उत्तर कोरियाच्या थेट सहभागाच्या गंभीर पैलूंवर लक्ष ठेवून आहोत. इंटरनेट अॅक्सेसबाबत हा प्रश्न रशियाला विचारला पाहिजे, आम्हाला नाही. सध्या आमचं प्राधान्य हे युक्रेनला पाठिंबा देण्यावर व त्याला लष्करी मदत देण्यावर आहे.
रशिया-उत्तर कोरिया संबंध दृढ होत असताना रशियाने युक्रेनसीमेवर एके-१२ रायफलसह ७००० हून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक तैनात केले आहेत. उत्तर कोरियाचे सैनिक सध्या रशियाच्या कुर्स्क भागात पहिल्यांदाच युक्रेनविरोधात लढत आहेत.