North korea news :उत्तर कोरियात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. परदेशी टीव्ही मालिका पहिल्याने किम जोंग ऊनने ३० मुलांची हत्या केली आहे. रिपोर्टनुसार, ही मुले दक्षिण कोरियाच्या माध्यमांवरील टीव्ही मालिका पाहत होते. यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. उत्तर कोरियात दक्षिण कोरियातील चित्रपट टीव्ही मालिका आणि कोरियन नाटकं पाहण्यास बंदी आहे. याचे उल्लंघन केल्याने या मुलांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या बाबत दक्षिण कोरियाचे न्यूज आउटलेट चोसुन टीवी (Chosun TV) व कोरिया जोंगएंग (JoongAng Daily) ने वृत्त दिले आहे. या मुलांना भर चौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचं वृत्त आहे. उत्तर कोरियामध्ये प्रसार मध्यमांवर सरकारचं नियंत्रण आहे. असे असले तरी, पायरेटेड यूएसबी स्टिकवर परदेशी टीव्ही मालिकांची सीमेपलीकडून तस्करी केली जात आहेत.
दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, 'उत्तर कोरियामध्ये असे तीन कायदे आहेत जे काळे कायदे म्हणून प्रसिद्ध आहेत. या कायद्याच्या जोरावर उत्तर कोरियाचे अधिकारी नागरिकांवर कठोरपणे नियंत्रण ठेवतात. जर उत्तर कोरियाच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यांना कठोर शिक्षा दिली जाते. उत्तर कोरियाचे अधिकारी त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील कठोर नियंत्रण ठेवतात. यामुळेच दक्षिण कोरियामध्ये बनवलेल्या टीव्ही सिरियल, नाटके, चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतांनाही पायरेटेड सीडी द्वारे चोरून दक्षिण कोरियाचे चित्रपट हे पाहिले जातात. जर असा एखादा व्यक्ति आढळल्यास उत्तर कोरियाचे प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करते.
दुसरीकडे, उत्तर कोरियाकडून आण्विक धोका वाढत आहे. या संदर्भात, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने प्रथमच संयुक्त आण्विक प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली आहे. उत्तर कोरियाकडून वाढता आण्विक धोका लक्षात घेता दोन्ही देशांनी केलेल्या हा करार महत्त्वाचे पाऊल आहे. दक्षिण कोरियावर हल्ला झाल्यास त्याच्या बचावासाठी अण्वस्त्रांसह लष्करी सहाय्यता देण्याचा करार दोन्ही देशात पूर्वीच झालेला आहे. या कराराद्वारे अमेरिका दक्षिण कोरियाला लष्करी मदत पुरवतात.
उत्तर कोरियामध्ये परदेशी टीव्ही मालिका पहिल्याने ३० मुलांची हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाल्याने खबळल उडाली आहे. हुकूमशहा किम जोंग उन विरोधात कुणालाही जाता येतं नाही. नियमबाह्य कारवाई करण्यासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. उत्तर कोरियाच्या नागरिकांना दक्षिण कोरियात तसेच देशाबाहेर जाण्यास देखील मनाई आहे.
संबंधित बातम्या