नोएडात साकारतेय नवी मायानगरी..! वर्षाला ३०० चित्रपटांच्या चित्रिकरणाची व्यवस्था, २ वर्षात होणार कार्यरत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नोएडात साकारतेय नवी मायानगरी..! वर्षाला ३०० चित्रपटांच्या चित्रिकरणाची व्यवस्था, २ वर्षात होणार कार्यरत

नोएडात साकारतेय नवी मायानगरी..! वर्षाला ३०० चित्रपटांच्या चित्रिकरणाची व्यवस्था, २ वर्षात होणार कार्यरत

Published Feb 28, 2025 01:15 PM IST

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या यमुना फिल्म सिटीमध्ये २०२७ पासून चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता असून मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला त्याची पायाभरणी होण्याची शक्यता आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्र

आता नोएडामध्ये नवी मायानगरी वसवली जाणार आहे. गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील यमुना फिल्म सिटीमध्ये २०२७ पासून चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता असून मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पायाभरणी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी यमुना फिल्म सिटीच्या उभारणीत चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची कंपनी 'बेव्ह्यू प्रोजेक्ट्स' आणि 'भूतानी ग्रुप' सहभागी आहेत.

कपूर गुरुवारी यमुना विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचले, जिथे जागेचा ताबा बिल्डरच्या कंपनीकडे देण्यात आला. ताबा पत्र प्राप्त करताना बोनी कपूर यांच्यासोबत भूतानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष भूटानी उपस्थित होते. यावेळी बोनी कपूर म्हणाले, यमुना फिल्म सिटी ही जगातील सर्वोत्कृष्ट फिल्म सिटी असेल. बांधकामापूर्वी भारतातील आणि परदेशातील इतर फिल्म सिटींचे मूल्यमापन करण्यात आले असून या सर्वांच्या वैशिष्ट्यांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्म सिटी बनविण्याचे उद्दिष्ट आहे. येथे फिल्म इन्स्टिट्यूटही उभारण्यात येणार आहे, चित्रपट निर्मात्यांना येथे सहाय्यक कलाकार मिळतील, ज्यामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च कमी होईल, तसेच स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल.

तसेच येथे 'फिल्म व्हिलेज' उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्टुडिओ, मॉल्स, दुकाने, व्यापारी संकुलयांचाही विकास करण्यात येणार आहे. रिटेल आउटलेट, फूड कोर्ट, हॉटेल्स, गेस्ट हाऊस अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. फिल्म सिटी पूर्णपणे तयार होण्यास ८ वर्षे लागतील, मात्र तीन वर्षांत येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी, इंग्रजी अशा ३०० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कलाकाराला कोणत्याही प्रकारच्या लोकेशनसाठी इतर कोणत्याही देशात जाण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीने फिल्म सिटी विकसित करण्यात येणार आहे.

या फिल्म सिटीसाठी १५१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात चित्रपट निर्मितीची सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, तर शेवटी व्यावसायिक उपक्रमांचा विकास केला जाईल. भूसंपादन दरम्यान बोनी कपूर आणि आशिष भूतानी यांनी भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

यमुना विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण वीर सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी सेक्टर २१ मधील इंटरनॅशनल फिल्म सिटीच्या बांधकाम कंपनीला जमिनीचा ताबा देण्यात आला. प्रॉडक्शन कंपनीचे मालक बोनी कपूर यांना ताबा पत्र देण्यात आले. मार्चअखेर ीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फिल्म सिटीची पायाभरणी केली जाईल, असे निर्मात्याने सांगितले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे वेळ मागितला आहे. पायाभरणी झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत येथे चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होईल, असे ते म्हणाले.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर