Viral news : कोलकाता रुग्णालयात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेबाबत रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच नोएडामधूनही एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथील सेक्टर ९४ मध्ये असलेल्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये एक कर्मचारी महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसला. यादरम्यान त्याच्या दुसऱ्या मित्राने दोघांचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केल आहे. तर महिला सफाई कामगाराला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या २ मिनिट २१ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पोस्टमॉर्टम हाऊसच्या शवागृहात डीप फ्रीजर रूममध्ये एक पुरुष व एक महिला आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती देखील अश्लील बोलत असून महिले सोबत संबंध ठेवण्याच्या तयारीत दिसत आहे. या डीप फ्रीजर खोलीमध्ये अनेक मृतदेह देखील ठेवण्यात आले आहेत.
या शवविच्छेदन गृहात एकही महिला कर्मचारी काम करत नाही. त्यामुळे व्हिडिओत दिसणारी महिला ही बाहेरची असल्याचं समजतं. बाहेरून आलेल्या महिलेला येथे प्रवेश कसा काय मिळाला? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कायदेशीर नियमानुसार शवागृहात ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहांशी छेडछाड केली जाऊ शकते. महिलेसोबत हे संबंध तिच्या संमतीने केले जात होते की तिच्यासोबत जबरदस्तीने केले जात होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शवविच्छेदन गृहात दररोज दोन सफाई कामगार ड्युटीवर असतात. दुपारी, प्रत्येकी एक डॉक्टर आणि एक फार्मासिस्ट पोस्टमॉर्टमसाठी जातात. हा व्हिडिओ डॉक्टर आणि फार्मासिस्ट येण्याच्या दोन तास आधी काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोस्टमॉर्टम हाउसचे प्रभारी डॉक्टर जैसलाल यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसणारा व्यक्ति हा सफाई कामगार असून तो या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करतो. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दुपारपर्यंत यासंदर्भातील पत्र जारी केले जाईल. शवविच्छेदन गृहात अशा प्रकारची कृती खपवून घेतली जाणार नाही.
अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका ट्विटला उत्तर देताना डीसीपी नोएडा म्हणाले, 'वरील घटनेच्या संदर्भात, या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत चौकशी केली जात आहे. याप्रकरणी सेक्टर-१२६ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.