ग्रेटर नोएडा पश्चिममधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक बालकाच्या क्रूरतेने मुक्या प्राण्याचा जीव गेला आहे. सोसायटीमध्ये खेळत असलेल्या बालकाने कुत्र्याच्या छोट्या पिल्ल्याला उचलून घेतले आणि पार्किंगच्या बेसमेंटमध्ये फेकले. यात या छोट्या प्राण्याचा जीव गेला. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आता प्राणीप्रमींसोबतच अन्य लोक या घटनेवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नोएडा एक्सटेंशनमध्ये गौरसिटीच्या १४ एवेन्यूमधील ही घटना आहे. या सोसायटीत जवळपास १० वर्षे वयाचा एक मुलगा गार्डन एरियामध्ये खेळत होता. या दरम्यान तो एका कुत्र्याच्या पिल्ल्याला उचलून घेतो आणि बेसमेंटच्या पार्किंगकडे घेऊन जातो. त्यानंतर इकडे-तिकडे पाहून पिल्ल्याला खाली फेकतो व पळून जातो. इतक्या उंचीवरून पडल्याने पिल्ल्याचा मृत्यू झाला आहे.
गौरसिटीमधील १४ एवेन्यू सोसायटीत राहणाऱ्या संदीप तिवारी यांनी सांगितले की, ज्या मुलाने कुत्र्याच्या पिल्ल्याला खाली फेकले तो मानसिक दृष्ट्या आजारी आहे. दरम्यान मुलाच्या कुटूंबीयांकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून श्वानप्रेमींसह अन्य लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पिल्ल्याच्या वेदनादायी मृत्यूवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.लोक सोशल मीडियो प्लेटफॉर्मवर या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसात जनावरांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी उत्तराखंड राज्यातील उधम सिंह नगर जिल्ह्यातील एक तरुणाने बेदम मारहाण करत एक कुत्र्याचा बळी घेतला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या