मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral video : रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा-बुक्क्या

Viral video : रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा-बुक्क्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2024 10:47 AM IST

Noida Girls Fight : नोएडामध्ये, रीलवरवर केलेल्या कमेंटवरून भर रस्त्यात चार मुलींनी जोरदार राडा घातला. चौघींनीही एकमेकींनाभर रस्त्यात हाणामारी करण्यास सुरुवात केली. ही घटना सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा, बुक्क्या
रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा, बुक्क्या

Noida Girls Fight viral news : नोएडाच्या फेज २ भागात राहणाऱ्या चार मुलींच्या दोन गटांमध्ये रीलवर केलेल्या कमेंटवरून तूफान राडा झाला. चौघींमध्ये यावरून ऐवढा वाद झाला की भर रस्त्यात त्यांनी एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी केली. ऐवढेच नाही तर एकमेकींना लाथा, बुक्क्यांचा प्रसाद देखील त्यांनी दिला. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या हाणामारीचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मिडियावर उपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Change : पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल

नोयडा पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमध्ये रीलवर केलेल्या कमेंटवरून जोरदार वाद झाला. दोन्ही गटातील मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या इयत्ता ९वी आणि १०वीत शिक्षण घेत आहेत. इंस्टाग्राम रीलवरील कमेंट्सवरून या तरुणींनधे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

Maharashtra Weather Update:मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; विदर्भात पावसाची शक्यता

शनिवारी दोघांमधील वाद वाढला आणि त्यांनी या बाबत एकमेकींना जाब विचारला. या तून चौघींमध्ये वाद वाढला. चारही मुली एकमेकांना धमकावत सेक्टर-९३ जैवविविधता उद्यानाजवळ पोहोचल्या. यादरम्यान चारही मुलींमध्ये जोरदार हाणामारी झाली. भर रस्त्यावर त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची हाणामारी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली या मुळे या मार्गावरची वाहतूकही देखील ठप्प झाली.

आजच्या तरुणांमध्ये रीलचे व्यसन इतके वाढले आहे की ते यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. मेट्रोपासून रस्त्यापर्यंत त्यांच्या कृत्यांमुळे मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही काळापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये होळी खेळताना दोन मुलींचा अश्लिल रील बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या मुलींनी नोएडाच्या रस्त्यावर बाईकवर बसून अनेक अश्लील रील्स बनवून वाद निर्माण केला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना हजारो रुपयांचा दंड ठोठावत त्यांचावर कारवाई केली होती. दरम्यान, भर रस्त्यात झालेल्या मारहाण प्रकरणी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. 

IPL_Entry_Point

विभाग