Uttar Pradesh Viralv Video: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७८ येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. कुत्र्याला फिरवण्यावरून झालेल्या वादातून दोन तरुणींनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शुक्रवारी व्हायरल झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले असता दोन्ही गटातील लोकांची समजूत काढण्यात आली. व्हिडिओतील तरुणींनी माफी मागितली.
हा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणी सोसायटीच्या आवारात कुत्र्याला फिरवत होत्या. त्यावेळी एका वृद्ध दाम्पत्यांनी कुत्र्याला उघड्यावर फिरवण्यास विरोध केला. यामुळे त्यांनी वृद्ध दाम्पत्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण मिटण्याऐवजी आणखी पेटले. रागाच्या भरात दोन्ही तरुणींनी वृद्ध दाम्पत्याला धक्काबुक्की केली. तसेच मारहाण केली.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी कुत्र्याला पकडून वृद्ध दाम्पत्यासोबत गैरवर्तन करत आहे. तर, दुसरी मुलगी वृद्धाला कानशिलात मारते. या घटनेमुळे सोसायटीतील लोक घटनास्थळी उपस्थित झाली. यानंतर एका व्यक्तीने दोन्ही मुलींची समजूत काढून त्यांना शांत केले. त्यानंतर त्या दोघेही आपल्या प्लॅटमध्ये निघून गेल्या. मात्र, यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला.
या प्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी दोन्ही बहिणींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण मुलींनी लेखी माफीनामा सादर केल्यानंतर या प्रकरणाशी तडजोड करण्यात आली,' अशी माहिती सेक्टर ११३ चे स्टेशन हाऊस ऑफिसर कृष्ण गोपाल शर्मा यांनी दिली.
उत्तर प्रदेशच्या नोएडा परिसरात बीएमडब्ल्यू कारमधून आलेल्या महिलेने कुंडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. हा सगळा प्रकार दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सेक्टर २० पोलीस स्टेशनच्या हद्दतील हे प्रकरण आहे. २ मिनिटे ५० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कुंडी चोरल्यानंतर महिला बीएमडब्लूच्या समोरच्या सीटवर जाऊन बसते. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर आणखी कोणी तरी बसलेलेआहे.
संबंधित बातम्या