Axe Perfume news : सात वर्षं परफ्यूम वापरला, पण सुगंधानं एकही तरुणी जवळ आली नाही, संतप्त तरुणानं कंपनीला कोर्टात खेचलं!-no success in attracting women youth sues axe perfume company for cheating causing mental suffering ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Axe Perfume news : सात वर्षं परफ्यूम वापरला, पण सुगंधानं एकही तरुणी जवळ आली नाही, संतप्त तरुणानं कंपनीला कोर्टात खेचलं!

Axe Perfume news : सात वर्षं परफ्यूम वापरला, पण सुगंधानं एकही तरुणी जवळ आली नाही, संतप्त तरुणानं कंपनीला कोर्टात खेचलं!

Aug 06, 2024 03:13 PM IST

Youth Sues Axe Perfume for Misleading Ads: एक्स परफ्यूमची जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करणारी असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी, यासाठी एका तरुणाने कोर्टात धाव घेतली.

एक्स परफ्यूमविरोधात ग्राहकाची कोर्टात धाव
एक्स परफ्यूमविरोधात ग्राहकाची कोर्टात धाव

Axe Perfume News : जाहिरात हे कंपनीसाठी प्रचाराचे साधन आहे. जाहिरातींमध्ये कंपन्या ग्राहकाला उत्पादनाशी भावनिकरित्या जोडतात. बहुतेक ग्राहक जाहिरात पाहून उत्पादनाबद्दल त्यांचे मत तयार करतात आणि वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या उत्पदनाची जास्तीत जास्त विक्री व्हावी, यासाठी बऱ्याच कंपन्या हटके अशा जाहिराती बनवतात. मात्र, असे करणे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या एका ग्राहकाने सात वर्षे एक्स परफ्यूम वापरला. परंतु, या कालावधीत एकही तरुणी जवळ न आल्याने संतापलेल्या ग्राहकाने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली. कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची संबंधित ग्राहकाने विनंती केली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचे उत्पादन एक्सची जाहिरात पाहून संबंधित तरुणाने हा परफ्यूम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एक्स परफ्यूमच्या जाहिरातीमध्ये असे दाखवण्यात आले आहे, एक तरुण परफ्यूम लावतो, त्यानंतर अनेक त्याच्या जवळ येतात. या जाहिरातीमुळे संबंधित ग्राहक इतका प्रभावित झाला की त्याने एक्स हा परफ्यूम वापरण्याचे ठरवले. तब्बल सात वर्षांपासून तो हा परफ्यूम वापरत आहे. परंतु, त्याला जाहिरात केल्याप्रमाणे परिणाम मिळाले नाहीत. यामुळे तो निराश झाला आणि त्याने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली. त्यांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, अशी विनंती केली. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट लिहून या प्रकरणाची माहिती दिली.

हर्ष गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'एका ग्राहकाने फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. वैभव बेदी असे तक्रार दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही तक्रार कंपनीचे उत्पादन एक्स परफ्यूम विरुद्ध आहे. जाहिरात पाहून वैभवने हे उत्पादन खरेदी केले होते. एक्स परफ्यूमची जाहिरात पाहून तो खूप प्रभावित झाला. जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले होते की, हे उत्पादन वापरल्यानंतर तरुणी सुगंधाने आकर्षित होतील.त्यामुळे वैभवने जवळपास सात वर्षे एक्स परफ्यूम वापरले. परंतु, या कालावधीत एकही तरुणी त्याच्याकडे आकर्षित झाली नाही. त्यामुळे त्याने कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.'

नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

हर्ष गोएंका यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने असे म्हटले आहे की, 'खूप चांगली गोष्ट घडली, देवाचे आभार, कोणीतरी सुरुवात केली. मी गेल्या १० वर्षांपासून हे उत्पादन वापरत आहे. या उत्पदनाचा फक्त सुगंध चांगला आहे.' दुसऱ्या वापरकरत्याने म्हटले आहे की, ‘ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.’

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात कायदा मंजूर

केंद्रातील मोदी सरकारने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यांतर्गत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. दंडही आकारला जाऊ शकतो.

विभाग