मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Swami Prasad maurya : हिंदू नावाचा कुठला धर्मच नाही, तो केवळ भ्रम; समाजवादी नेत्याचं वादग्रस्त विधान

Swami Prasad maurya : हिंदू नावाचा कुठला धर्मच नाही, तो केवळ भ्रम; समाजवादी नेत्याचं वादग्रस्त विधान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 28, 2023 02:51 PM IST

Swami Prasad Maurya on Hindu Religion : उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

Swami Prasad Maurya
Swami Prasad Maurya

Swami Prasad Maurya on Hindu Religion : 'हिंदू नावाचा कुठला धर्मच अस्तित्वात नाही. ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण हा खरा धर्म आहे आणि सर्व विषमतेचे कारणही ब्राह्मणवादच आहे. या ब्राह्मणवादाची पाळंमुळं खूप खोलवर पसरली आहेत.'

ट्रेंडिंग न्यूज

हे उद्गार आहेत समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे. लखनऊमध्ये अर्जक संघाचे संस्थापक महामना रामस्वरूप वर्मा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य केलं.

Delhi Crime : दिल्ली हादरली ! १३ वर्षांच्या मुलावर ५ जणांचा सामूहिक अत्याचार; आठवड्याभरापासून सुरू होता प्रकार

'ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म ठरवून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आपल्या धर्माच्या जाळ्यात अडकवण्याचा कट आहे. हिंदू नावाचा खरोखरच एखादा धर्म असता तर आदिवासींना सन्मान मिळाला असता, दलितांचा सन्मान झाला असता, मागासलेल्यांनाही सन्मान मिळाला असता. मात्र, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊनही देशाच्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपतदी मुर्मू यांचा मंदिरात अपमान केला जातो. त्यांच्या हाताखालच्या मंत्रिमंडळातील मंत्री केवळ उच्चवर्णीय आहे म्हणून मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेतो. मुर्मू या आदिवासी समाजातील असल्यामुळं त्यांना थांबवलं जातं. आदिवासी समाज हिंदू असता तर त्यांना अशी वागणूक मिळाली असती का?,' असा प्रश्न मौर्य यांनी केला.

‘ब्राह्मणी व्यवस्थेतील हुशार लोक आजही आम्हाला आदिवासीच समजतात. याआधी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जे ब्रह्मा मंदिरात गेले होते, मात्र त्यांना पायऱ्यांवरच थांबवण्यात आलं होतं. कारण ते दलित समाजातून होते. दलित-आदिवासी समाजातील लोकांनी आता कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये. तुम्ही त्यांच्यासाठी रक्त सांडलं तरी ते तुम्हाला आदर देणार नाहीत, कारण ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाचे समजतात,’ असं मौर्य म्हणाले.

tripti tyagi video : मुस्लिम विद्यार्थ्यांला मारहाण झालेली शाळा बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय

अखिलेश यादव मुख्यमंत्रिपदावरून गेल्यानंतर याच लोकांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आधी गोमुत्रानं धुतलं, नंतर गंगाजल टाकून धुतलं. अखिलेश यादव ब्राह्मण असते तर असं करण्याची हिंमत कोणी केली नसती. आदिवासी, दलित याच लोकांनी अनेक वर्षांपूर्वी जनावरांपेक्षाही वाईट जीवन जगण्यास भाग पाडले गेले होते. अशा लोकांपासून सावध राहा, असं आवाहन स्वामी प्रसाद यांनी केलं.

WhatsApp channel