मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Online Payment Viral Video: डिजिटल पेमेंटचा असाही उपयोग? व्हिडिओ पाहून लावाल डोक्याला हात!

Online Payment Viral Video: डिजिटल पेमेंटचा असाही उपयोग? व्हिडिओ पाहून लावाल डोक्याला हात!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 07, 2024 06:26 PM IST

Viral Video: डिजिटल पेमेंटचा असा उपयोग पाहून सगळेच चक्रावून गेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Online Payment (Representative Image)
Online Payment (Representative Image)

Online Payment Viral Video: सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. तर, काही व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात तरुणीचा डान्स पाहून एक तरुण खूप खूश होतो. त्यानंतर तो तिला ज्या पद्धतीने पैसे देतो, हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकीत होतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्टेजवर नाचताना दिसते आहे. तिचा डान्स पाहून एक तरुण खूप खूश झाला आणि तिला पैसे द्यायला सुरुवात करतो. परंतु, जेव्हा त्याच्या हातातील नोटा संपतात तेव्हा तो असे काही करतो की पाहून सगळेच डोक्याला हात लावतात. हातातील पैसे संपल्यानंतर हा तरुण नाचणाऱ्या तरुणीला १० रुपये ऑनलाइन पेमेंट करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: चांगुलपणाचा केवळ दिखावा करताय का? अंबानीच्या लग्नात रजनीकांत यांची ‘ती’ कृती पाहून नेटकरी संतापले!

हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या पेजद्वारे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने लिहिले की, इलेक्ट्रॉनिक बाँड अजूनही कागदावर आधारित आहेत. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, येथेही आता ऑनलाइन पेमेंटचा वापर होऊ लागला आहे. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, हे फक्त भारतातच होऊ शकते.

WhatsApp channel

विभाग