मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, असे का म्हणाले उच्च न्यायालय?

परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, असे का म्हणाले उच्च न्यायालय?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 26, 2024 08:36 PM IST

Court News : कोर्टाने म्हटले की, संमतीने दोन प्रौढ भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध गुन्हा नाही. मात्र याला अनैतिक समजले जाते.

कोर्ट म्हणाले परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही
कोर्ट म्हणाले परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही

दोन सज्ञान जोडप्यामध्ये परस्पर संमतीने जर शारीरिक संबंध प्रस्तापित होत असतील तर हा कायदेशीर गुन्हा नाही. ही टिप्पणी राजस्थान हायकोर्टाने केली आहे. एका पतीकडून दाखल याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, कलम ४९७ नुसार व्यभिचार अपवादात्मक होता. तो आधीच रद्द करण्यात आला आहे.  

जस्टिस बीरेंद्र कुमार यांनी म्हटले की, आयपीसी कलम ४९४ (द्विविवाह) नुसार केस बनत नाही. कारण दोघांपैकी कोणीही पती किंवा पत्नी हयात असताना दुसरा विवाह केलेला नाही. जोपर्यंत विवाह झाल्याचे समोर येत नाही, लिव-इन-रिलेशनशिप कलम ४९४ नुसार येत नाही. 

खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्त्याने हा आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे आरोपींनी अपहरण केले होते. मात्र त्याच्या पत्नीने कोर्टात सांगितले की, तिचे कोणीही अपहरण केले नव्हते तर ती आपल्या संमतीने आरोपी संजीवसोबत लिव इन रिलेशनमध्ये रहात होती. न्यायालयासमोर आले की, आयपीसी कलम ३६६ नुसार हा गुन्हा नाही व एफआयआर रद्द केला जात आहे. 

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याचे वकीलांनी युक्तीवाद केला की, महिलेने स्वीकार केले आहे की, तिचे संजीवसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे हा आयपीसी कलम ४९४ व ४९७ नुसार गुन्हा आहे. वकीलांनी सामाजिक नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे अपील केले. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा हवाला देताना एकसदस्यीय खंडपीठाने म्हटले की, हे सत्य आहे की, आमच्या समाजात हा विचार पक्का आहे की,  शारीरिक संबंध केवळ पती-पत्नीमध्येच होतो. मात्र जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाहबाह्य संबंध ठेवतात, तो गुन्हा ठरत नाही.

कोर्टाने म्हटले की, संमतीने दोन प्रौढ भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध गुन्हा नाही. मात्र याला अनैतिक समजले जाते. कोर्टाने म्हटले की, एक सज्ञान महिला कोणासोबतही विवाह करू शकते, कोणासोबतही राहू शकते. याचिकाकर्त्याच्या पत्नीने सांगितले की, तिने आपल्या मर्जीने घर सोडले व संजीवसोबत राहू लागली. 

IPL_Entry_Point

विभाग