मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'अन्न नाही की पाणी', काशी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास एसी डब्यात विनातिकीट प्रवाशांची गर्दी, पाहा व्हिडिओ

'अन्न नाही की पाणी', काशी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास एसी डब्यात विनातिकीट प्रवाशांची गर्दी, पाहा व्हिडिओ

Jun 14, 2024 10:20 PM IST

Kashi Express : काशी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास एसी डब्यात विनातिकीट प्रवासी उभे राहून बसलेले दिसत आहेत, त्यामुळे स्वच्छतागृहात जाण्यास अडथळा निर्माण झाला.

काशी एक्सप्रेसच्या सेकंड एसी बोगीत विनातिकीट प्रवाशांची गर्दी
काशी एक्सप्रेसच्या सेकंड एसी बोगीत विनातिकीट प्रवाशांची गर्दी (X/@imAdshaykh0731)

आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल या आशेने एका प्रवाशाने काशी एक्स्प्रेसच्या सेकंड एसी कोचमध्ये आरक्षण केले होते. मात्र, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी भरलेला डबा पाहून त्यांना धक्काच बसला.  या गर्दीने शौचालयाकडे जाणारा रस्ता तर अडवलाच, शिवाय डब्याच्या दारातही उभे राहिले. 

बोगीचे सर्व  दरवाजे उघडे असल्याने गाडीचा एसी व्यवस्थित काम करत नव्हता. अदनान बिन सुफियान नावाच्या प्रवाशाने आपल्या स्मार्टफोनमध्ये डब्याची भीषण परिस्थितीचा व्हिडिओ बनवला व  सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर अधिकाऱ्यांना टॅग करून आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली.

ट्रेंडिंग न्यूज

अश्विनी वैष्णव, सर, कृपया एसीच्या २ टियरची परिस्थिती बघा. अन्न नाही, पाणी नाही. वॉशरूमला जायला जागा नाही. एसी काम करत नाही आणि दरवाजा उघडा आहे. कृपया यावर कारवाई करा,' असे प्रवाशाने एक्सवर लिहिले आहे.

काशी एक्स्प्रेसचा खचाखच भरलेला सेकंड एसी डबा येथे पहा:

त्याने आपल्या पोस्टला रिप्लाय देत कॅप्शन मध्ये एक फोटो शेअर केला आहे,  यावर कृपया काहीतरी कारवाई करा. गेटजवळ लहान मुलं आहेत. बायका गेटजवळ उभ्या आहेत.

प्रवाशांच्या मदतीसाठी असेलेल्या रेल्वे सेवा या अधिकृत एक्स हँडलवरून या  पोस्टची लवकरच दखल घेतली गेली. ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली. आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकारी डीआरएम भुसावळ यांच्याशी संपर्क साधला, अशी माहिती रेल्वे सेवेने दिली.

बहुतेक ट्रेनमध्ये ही परिस्थिती आहे. कृपया याची नोंद घ्या,' असे एका एक्स युजरने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत लिहिले आहे.

नव्या गाड्या धावत नसतील, तर हीच परिस्थिती असेल, कदाचित काही काळानंतर वंदे भारत गाड्यांमध्येही हे दिसेल, असे आणखी एका युजरने म्हटले आहे.

WhatsApp channel