FASTag Rule: गाडीच्या विंडस्क्रीनवर फास्टटॅग लावण्याचा नियम आहे, पण काही चालक मात्र, विंडस्क्रीनवर FASTag स्टिकर लावण्याऐवजी हाताने दाखवून टोल भारतात. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांचा वेग मंदावत असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे सोमवारपासून कारच्या विंडशिल्ड वर फास्टटॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर हा टॅग विंडशिल्डवर न लावता हाताने दाखवल्यास कार चलकांना दुप्पट टोल टॅक्स भरावा लागणार आहे.
सध्या टोल प्लाझा व्यवस्थापन अशा वाहनचालकांना जागरूक करत आहे. एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) ची उपकंपनी असलेल्या नॅशनल हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने ३ दिवसांपूर्वी एक आदेश जारी केला होता, की वाहनाच्या विंड स्क्रीनवर फास्टॅग लावावा लागेल. असे न करणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स आकारण्यात येणार आहे. या आदेशानंतर शनिवारपासून शहरातील बदरपूर टोल प्लाझा येथे या आदेशाचे पालन करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून फास्टटॅग विंडशिल्डवर न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या आदेशाची माहिती देण्यासाठी टोल प्लाझावर देखील सूचना लावण्यात आल्या आहेत.
सोमवारपासून टोल प्लाझाचे कर्मचारी अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल करणार आहेत. टोल टॅक्स कर्मचाऱ्यांनी सांगितले की, टोल टॅक्स भरणारे वाहनचालक हातात फास्टॅग घेऊन रोज टोल प्लाझावर येत असतात. अशा वाहनचालकांमुळे टोलनाक्यांवर वाहने रेंगाळू लागतात. त्यामुळे टोलनाक्यावरील इतर वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात.
फास्टॅगचा योग्य वापर करणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी आता हातात फास्टॅगचे स्टिकर घेऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका टोल कर्मचाऱ्याने सांगितले की, काही वाहनचालक हे हातात स्टिकर घेऊन टोल भरतात. त्यांच्यामुळे टोल प्लाझावर गर्दी होत असते. तर काही वेळा पोलिसही अशा प्रकारे टोल भरताना दिसले आहेत.
बदरपूर टोल प्लाझावरून २४ तासांत सरासरी ८० हजार वाहने जातात. सकाळ-संध्याकाळ येथे वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या गर्दीत हातात फास्टॅग असलेल्या कार चालकांकडून दुप्पट टोल कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
फरिदाबादला चारही बाजूंनी टोल टॅक्स बूथ लावण्यात आले आहेत गुरुग्राम फरीदाबाद द्रुतगती मार्ग, सोहना-बल्लभगड, दिल्ली-आग्रा महामार्ग, KGP (कुंडली-गाझियाबाद-पलवल) DND KMP द्रुतगती मार्ग (हा द्रुतगती मार्ग शहरापासून दिल्लीपर्यंत टोल करमुक्त असेल), ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बांधला जात आहे वाहनचालकांना अजूनही खिसा हलका करावा लागणार आहे.
संबंधित बातम्या