Viral News: जगभरात आतापर्यंत अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. काही आंदोलन न्याय मिळवण्यासाठी केली जातात. तर, काही आंदोलनाद्वारे समाजात बदलाची मागणी केली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही तरुणी पुरुषांच्या दाढीला विरोध करत आहेत. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
तरुणींनी क्लीन शेव्ह बॉयफ्रेंडसाठी रॅली काढली आहे. या तरुणींच्या हातात फलक दिसत आहेत, ज्यात पुरुषांसाठी मॅसेज लिहिले आहेत. यातील एका फलकावर प्रेम वाढवा, दाढी नाही, असे लिहिले आहे. तर, काही फलकांमध्ये दाढी हवी आहे की गर्लफ्रेन्ड, असा थेट पुरुषांना इशारा देणारा मॅसेज लिहिण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणींनी आपल्या चेहऱ्यावर दाढी लावली आहे. या तरुणींना पाहून अनेकजण शॉक होत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक आश्चर्याने तरुणींकडे बघत आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ मजेदार आणि मनोरंजक वाटत आहे. तर, काहीजण याला केवळ रोड शो किंवा रीलसाठी केलेला स्टंट म्हणत आहेत. मात्र, या रॅलीचा खरा उद्देश काय? यामागचे कारण समजू शकले नाही.
@gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. asआतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, तरुणी अशा म्हणू लागल्या तर, तरुणांचे कसे होईल. दुसऱ्या व्यक्ती म्हणत आहे की, तरुणींना पुरुषांच्या दाढीचा काय त्रास आहे? तिसरा व्यक्ती म्हणाला की, 'हे पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबांने त्यांचे घरी चांगलेच स्वागत केले असेल.'
कामाचे आमिष दाखवून शेतकऱ्याकडून लाच घेताना लेखपाल आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, घाईघाईने केलेल्या चौकशीत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विभागीय कारवाई करण्यात आली. एसडीएम साक्षी शर्मा यांनी सांगितले की, लाचखोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामराजहैती येथे तैनात लेखपाल साबिर अली यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल आणि विभागीय स्तरावरून पुढील कारवाई देखील केली जाईल.
संबंधित बातम्या