सावधान..! ना कोणता कॉल आला ना ओटीपी मागितला, मात्र एका रात्रीत व्यापाऱ्याच्या खात्यातून ३० लाख रुपये गायब
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सावधान..! ना कोणता कॉल आला ना ओटीपी मागितला, मात्र एका रात्रीत व्यापाऱ्याच्या खात्यातून ३० लाख रुपये गायब

सावधान..! ना कोणता कॉल आला ना ओटीपी मागितला, मात्र एका रात्रीत व्यापाऱ्याच्या खात्यातून ३० लाख रुपये गायब

Nov 14, 2024 11:54 PM IST

आग्रा येथील एका व्यापाऱ्याच्या चालू खात्यातून सायबर चोरट्यांनी ३० लाख रुपये उडवले आहेत. सकाळी उठून मोबाइल पाहिला तेव्हा व्यापाऱ्याला धक्का बसला. त्यांनी सांगितले की, त्यांना कोणताही फोन आला नाही किंवा कोणालाही ओटीपी सांगितला नाही. तरीही खात्यातून पैसे उडाले आहेत.

सायबर फ्रॉड
सायबर फ्रॉड

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कमला नगर येथील एका व्यापाऱ्याच्या खात्यातून एका रात्रीत तब्बल ३० लाख रुपये गायब झाले आहेत. सकाळी उठून त्यांनी मोबाइल तपासला असता त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ बँक गाठली व अकाऊंट ब्लॉक करत ऑनलाइन तक्रार केली. सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले.  त्यानंतरही पुढे काय करायचे हे कोणीच सांगितले नाही. खात्यातून पैसे कसे उडवले ? चूक कुठे झाली? गुरुवारी पीडिताने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची विनंती केली.

धर्मेंद्र कुमार अग्रवाल यांचे चांदीचे दुकान आहे. त्यांनी  पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी उठल्यावर मोबाईलमध्ये खात्यातून पैसे काढण्याचे मेसेज येत होते. हे पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. आयसीआयसीआय बँकेत त्यांचे चालू खाते आहे. तात्काळ बँकेत जाऊन खाते ब्लॉक केले. त्यांना कोणताही फोन आला नाही. कोणालाही ओटीपी सांगितला नाही. रात्री त्याच्या मोबाइलवर ओटीपी आले होते. सायबर गुन्हेगारांना ते कसे समजले माहीत नाही. या घटनेने सराफा व्यावसायिक हादरला आहे. मी दोन दिवसांपासून घरी स्वयंपाक बनवलेला नाही.  त्याला काय करावं तेच कळत नाही. गुरुवारी ते सायबर पोलिस ठाण्याबाहेर दोन तास थांबले होते. गुन्हा दाखल झाला की नाही, याचा शोध घ्यायचा होता. सायबर पोलिस ठाण्यात कोणीही आढळले नाही.

सायबर पोलिस स्टेशनने बुधवारी प्राथमिक तपास केला. तेव्हा सायबर गुन्हेगारांनी खात्यातून उडविलेल्या पैशांतून ऑनलाइन शॉपिंग केल्याचे समोर आले. अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर खरेदी केले आहेत. हे व्हाउचर केव्हाही वापरता येऊ शकतात. पोलिसांकडून कंपनीला मेल पाठविण्यात आले आहेत. सध्या त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

सायबर गुन्ह्यांबाबत पोलिस गंभीर नाहीत -

दोन लाखाची जरी चोरी झाली तरी पथक तयार केले जाते. अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केली जाते. पीडिताशी बोलून त्यांना आश्वासन दिले जाते की, चोरांना लवकरात लवकर पकडू. याउलट लाखोंच्या सायबर फसवणुकीतही पीडिताला पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. पुढे काय कारवाई केली जाईल, हे त्याला कोणीच सांगत नाही. तो आता कधी येणार आहे? पीडित  नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत राहतो.

सायबर गुन्ह्यांच्या तपासात यूपी पोलिस पिछाडीवर असल्याचे सिद्ध होत आहे. सायबर क्राईम आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये प्रावीण्य नसल्यामुळे तपासकर्त्यांना योग्य प्रकारे तपास करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारला न्यायालयात अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा आपल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे. 

यावर सरकारचे विशेष सचिव निकुंज मित्तल यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह आणि डीजीपी यांना पत्र लिहून सायबर क्राईम आणि तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञ अन्वेषक किंवा अन्य अधिकाऱ्यांचीच चर्चा करावी, असे निर्देश दिले आहेत. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर